गुरुद्वारा भागात आज ‘लोकमत’चे महारक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:13 IST2021-07-05T04:13:26+5:302021-07-05T04:13:26+5:30

स्वतंत्रता संग्रामसेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय लोकमत रक्ताचं नातं या रक्तदान ...

Lokmat's blood donation camp in Gurudwara area today | गुरुद्वारा भागात आज ‘लोकमत’चे महारक्तदान शिबिर

गुरुद्वारा भागात आज ‘लोकमत’चे महारक्तदान शिबिर

स्वतंत्रता संग्रामसेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय लोकमत रक्ताचं नातं या रक्तदान महायज्ञाचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. याअंतर्गत सोमवारी गुरुद्वारा भागात रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे.

शिबिराचे उद्घाटन श्री गुरुद्वारा लंगर साहिबचे संतबाबा बलविंदरसिंघजी आणि गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांच्या हस्ते सकाळी साडेआठ वाजता होणार आहे. यावेळी समाजातील इतरही मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रक्तसंकलनासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच रेडक्रॉस सोसायटीचे सहकार्य लाभले आहे. रक्तदान शिबिरादरम्यान कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.

संत बाबा बलविंदरसिंघजी करणार उद्घाटन

सोमवारी होत असलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संत बाबा बलविंदरसिंघ आणि बोर्डाचे अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांच्या हस्ते होणार आहे.

Web Title: Lokmat's blood donation camp in Gurudwara area today