नांदेड जिल्ह्यात २३ हजार शेतकºयांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:54 AM2017-11-22T00:54:03+5:302017-11-22T00:54:13+5:30

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केलेल्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार ७१२ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत़ आजपर्यंत जिल्ह्यातील १२४७ गावांतील २३ हजार १७९ शेतकºयांच्या कर्जमाफीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे़ चार बँकांतील ८ हजार ९७० शेतकºयांचे कर्जमाफीचे ६१ कोटी २४ लाख रूपये मंजूूर झाले आहेत.

Loan waiver to 23 thousand farmers in Nanded district | नांदेड जिल्ह्यात २३ हजार शेतकºयांना कर्जमाफी

नांदेड जिल्ह्यात २३ हजार शेतकºयांना कर्जमाफी

googlenewsNext
ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना : ग्रीन लीस्टमध्ये नाव येण्याची शेतकयांना प्रतीक्षा

श्रीनिवास भोसले।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केलेल्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील ३ लाख १२ हजार ७१२ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत़ आजपर्यंत जिल्ह्यातील १२४७ गावांतील २३ हजार १७९ शेतकºयांच्या कर्जमाफीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे़ चार बँकांतील ८ हजार ९७० शेतकºयांचे कर्जमाफीचे ६१ कोटी २४ लाख रूपये मंजूूर झाले आहेत.
शासनाने मोठा गाजावाजा करीत शेतकºयांची कर्जमाफी केली़ परंतु, या निर्णयाला पाच महिने उलटले तरी अद्याप प्रत्यक्षात किती शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला हे कोणालाही सांगता येत नाही़ आजपर्यंत पात्र शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत़ दरम्यान, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त आकडेवारीवरून पंधरा तालुक्यांतील १२४७ गावांतील २३ हजार १७९ शेतकरी पात्र ठरले आहेत़ ही यादी कर्जमाफीच्या संकेतस्थळावर ग्रीन लिस्टमध्ये आहे़ तर जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांची कर्जमाफी त्रुटी आणि तांत्रिक प्रक्रियेमध्ये अडकली आहे़
ग्रीन लिस्टप्रमाणे जिल्ह्यातील कर्जमाफी लाभार्थीसंख्या पुढीलप्रमाणे- नांदेड तालुक्यातील ६५ गावांतील १७८२, कंधार ११९ गावांतील १३६०, लोहा तालुक्यातील ९६ गांवातील १३८५, मुखेड १२७ गावांतील ५९४६, देगलूर-९१ गावांतील ७२४, बिलोली- ७५ गावांतील १ हजार ८६ शेतकरी, नायगाव तालुक्यात ८१ गावांतील १ हजार ९५, हदगाव तालुक्यातील ११५ गावांतील ३ हजार ५६२, अर्धापूर तालुक्यात ४० गावांतील ८९३, मुदखेड - ५३ गावांचे ३९९, भोकर ७२ गावांतील १०६५, उमरी- ६० गावांतील ५९, किनवट - १३३ गावांतील ८४९, माहूर ६४ गावांतील ८९९ तर हिमायतनगर तालुक्यातील ५६ गावांतील २ हजार ७५ असे एकूण २३ हजार १७९ शेतकरी पहिल्या यादीत पात्र ठरले तर धर्माबाद तालुक्याची माहिती उपलब्ध झाली नाही़
चार बँकांचे ६१ कोटी २४ लाख रूपये मंजूर
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या ४ हजार ६७२ शेतकरी खातेदारांचे ३३ कोटी ३० लाख रूपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ४ हजार २८२ खातेदारांचे २७ कोटी ७४ लाख, आंध्र बँकेच्या ४ खातेदारांचे ७ लाख तर पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेच्या १२ खातेदारांचे १३ लाख असे एकूण ६१ कोटी २४ लाख रूपये मंजूर झाल्याचे लीड बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर यांनी सांगितले़ यात बहुतांश शेतकºयांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग झाली आहे़ उर्वरित शेतकºयांचीदेखील लवकरच होईल, असे त्यांनी सांगितले़
४सरसकट कर्जमाफी निर्णयानंतर शासनाने आठ ते नऊ जीआर काढले़ यातून शासनाला कमीत कमी शेतकºयांना लाभ द्यायचा हे स्पष्ट होते़ नवीन कर्ज बंद पडले, त्यामुळे पेरणी, उत्पन्न घटणार, यातून आर्थिक कोंडी होवून पुन्हा शेतकरी अडचणीत सापडणार आहे़ कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा होण्यास जेवढा विलंब लागेल, तेवढा परिणाम सरकारला भोगावा लागेल़ - शंकर अण्णा धोंडगे, शेतकरी नेते़

Web Title: Loan waiver to 23 thousand farmers in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.