चला पक्ष्यांचे रक्षण करू या स्पर्धेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:18 IST2021-04-27T04:18:29+5:302021-04-27T04:18:29+5:30

या उपक्रमात महाराष्ट्रातील सर्व विभागातून तसेच महाराष्ट्राबाहेरील जिल्ह्यातून स्पर्धकांनी उत्साही सहभाग नोंदवित स्पर्धा यशस्वी केली. या स्पर्धेचा निकाल जाहीर ...

Let's protect the birds | चला पक्ष्यांचे रक्षण करू या स्पर्धेचा निकाल जाहीर

चला पक्ष्यांचे रक्षण करू या स्पर्धेचा निकाल जाहीर

या उपक्रमात महाराष्ट्रातील सर्व विभागातून तसेच महाराष्ट्राबाहेरील जिल्ह्यातून स्पर्धकांनी उत्साही सहभाग नोंदवित स्पर्धा यशस्वी केली. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक राहुल आगडे (मूल जि.चंद्रपूर) यांना मिळाले असून द्वितीय पारितोषिक नांदेड येथील महेश बाहेती यांनी पटकावले आहे. तृतीय पारितोषिक अमोल सरोदे (अर्धापूर) व धनश्री राऊत (आर्णी, जि.यवतमाळ) या दोन स्पर्धकांमध्ये विभागून देण्यात आले आहे.

प्रोत्साहनपर पारितोषिक विजेत्यांमध्ये अनंत कौठेकर (नांदेड), सत्यनारायण नागोरी (देगलूर), इशा काबरा (नांदेड), प्राप्ती देवतळे (आष्टा), कुसुम पारटकर (अर्धापूर), नंदिनी गिन्नारे (महू,म.प्र.) दिवेश गिनारे (नागपूर), मकरंद फुलारी (सगरोळी), वैष्णवी बोकारे (नांदेड), स्वाती पारधी (कुर्‍हा) यांचा समावेश आहे. जि. प. प्राथमिक शाळा, मारतळा, जि.नांदेड येथील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सामूहिक सहभाग घेत विशेष गौरव प्राप्त केला आहे.

या स्पर्धेसाठी परीक्षक वृक्षमित्र संतोष मुगटकर, डाॅ. परमेश्वर पौळ, डाॅ. फरहत बेग, प्रितम भराडिया व सतीश कुलकर्णी यांनी काम पाहिले.

Web Title: Let's protect the birds