शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
3
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
4
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
5
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
6
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
7
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
8
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
9
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
10
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
11
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य
12
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
13
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
14
विशेष लेख: तहव्वुर राणाला आणले, मेहुल चोक्सीचे काय? प्रत्यार्पणाचा इतिहास
15
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
16
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
17
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
18
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
19
नियमांचे उल्लंघन कराल, तर वाळू डेपो होणार रद्द; महसूल मंत्र्यांचा इशारा

संत विचारांचा अंगीकार करून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुता वाढवू या: अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 19:13 IST

सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव हे संतांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात: अजित पवार

- मारोती चिलपिपरेकंधार (नांदेड) : मराठवाड्याची भूमी संघर्ष आणि शौर्याची भूमी आहे, आणि याच भूमीवर संतांची शिकवणही आहे. संघर्ष करून प्राप्त केलेली यशस्वी परंपरा आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहे. संत विचारांचा अंगीकार करून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुता वाढवू या, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी श्रीक्षेत्र उमरज येथे १०८ कुंडी विष्णूयाग महायज्ञ व श्री देवकीनंदनजी ठाकूर महाराज यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

अजित पवार पुढे म्हणाले, "मराठवाड्याला सहजासहजी काही मिळाले नाही, ते संघर्ष करून मिळवले आहे. त्याच इतिहासाला आजही आपण सन्मान देत आहोत. संत परंपरेचा विचार करत असताना, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, आणि संत एकनाथ यांच्या शिकवणीचे महत्त्व स्पष्ट होते. त्यांनी प्रेम, समता, बंधुत्व यावर आधारित जीवनशैली दिली." तसेच, महाराष्ट्रातील सर्वधर्मसमभावाच्या शिकवणीवर बोलताना ते म्हणाले की, "इथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध, जैन सर्वधर्म एकत्र राहतात. माणुसकी हाच धर्म आहे. जातीधर्माच्या सीमापार करत संतांनी मानवतेचा संदेश दिला. सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव हे संतांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात," असे ते म्हणाले. 

श्रीक्षेत्र उमरज येथील धाकटे पंढरपूर श्री संत नामदेव महाराज संस्थानाच्या पवित्र भूमीवर आयोजित या कार्यक्रमामध्ये राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत संस्थानाचे महंत श्री एकनाथ महाराज यांनी संस्थानाच्या समाज उपयोगी कार्याची माहिती दिली. तसेच संस्थानला जोडणाऱ्या काही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मागणी करण्यात आली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNandedनांदेड