चंदेल यांचे व्याख्यान.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:16+5:302021-05-30T04:16:16+5:30
तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त मास्क वाटप नांदेड : बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने तथागत गौतम ...

चंदेल यांचे व्याख्यान.
तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त मास्क वाटप
नांदेड : बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी ॲड. नितीन सोनकांबळे तर नांदेड बामसेफचे एम. बी. कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष राहुल कोकरे यांच्यासह सुभाष लोखंडे, बी. एस. गोडबोले, गोविंद कोंके, ज्योतिबा भोळे, रोहिदास गोमस्कर, जय पंडित, राजरत्न सदावर्ते जयमालाताई महाबळे, शिल्पाताई लोखंडे, कुंदन कोकरे, गौरव कोकरे, स्वयं कोकरे आदींनी परिश्रम घेतले.
घरकुल मार्टचे उद्घाटन
नांदेड : महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने पंचायत समिती नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने घरकुल मार्टचे बळीरामपूर येथे यू. डी. तोटावाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता समूह आणि ग्रामसंघाच्या वतीने बळीरामपूर येथे भरारी महिला ग्रामसंघने घरकुल बांधकामासाठी लागणारे साहित्य विक्री सुरू करणात येणार आहे. या प्रसंगी सरपंच अमोल गोडबोले, बांधकाम विभागाचे आरेखक अमित उगवे, उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक इरवंत सूर्यकार, माजी सरपंच नागोराव आंबटवार, मोहन शिंदे, ग्रामसंघाच्या अध्यक्षा गंगाबाई भोळे, निर्मला शिंदे आदींची उपस्थिती होती.