आखाड्यावरून गाय नेली सोडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:13 IST2021-07-10T04:13:41+5:302021-07-10T04:13:41+5:30

मजुराला तिघांनी केली मारहाण बळीरामपूर येथे सासरवाडीला आलेल्या जावयाला तिघांनी बेदम मारहाण केली. ही घटना २९ जून रोजी घडली. ...

Leaving the cow Nelly from the arena | आखाड्यावरून गाय नेली सोडून

आखाड्यावरून गाय नेली सोडून

मजुराला तिघांनी केली मारहाण

बळीरामपूर येथे सासरवाडीला आलेल्या जावयाला तिघांनी बेदम मारहाण केली. ही घटना २९ जून रोजी घडली. प्रताप सटवाजी कांबळे असे मजुराचे नाव आहे. त्यांना प्रयागबाई शिवाजी वाघमारे, मीराबाई इंगळे आणि प्रकाश शिवाजी वाघमारे या तिघांनी मारहाण केली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अपघात प्रकरणात कन्स्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा

नांदेड ते भोकर रस्त्यावर एका खड्ड्यात दुचाकीसह पडून एकाचा मृत्यू झाला होता, तर अन्य एक जण जखमी झाला होता. या जखमीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणात निखिल कन्स्ट्रक्शनच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बळीराम अर्जुन आटोळे रा.जालना आणि ब्रिजेश जोगेश्वर केवर रा.मध्य प्रदेश हे दोघे जण २५ जून रोजी एम.एच.२१, बीएल ११५० या क्रमांकाच्या दुचाकीवरून नांदेड ते भोकर जात होते. आमदरी शिवारात टोल नाक्यासाठी करण्यात आलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने, ते दोघेही दुचाकीसह खड्ड्यात पडले होते. या अपघातात जागीच एकाचा मृत्यू झाला होता, तर दुसरा उपचारादरम्यान मरण पावला. या प्रकरणात कृष्णा आटोळे यांच्या तक्रारीवरून निखिल कन्स्ट्रक्शनचे काम पाहणारे आणि देखरेखीसाठी असलेल्या कर्मचाऱ्यावर भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Leaving the cow Nelly from the arena