लाॅकडाऊनमधील देखभाल दुरुस्तीमुळे वर्षभराच्या विश्रांतीनंतरही लालपरी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST2021-06-02T04:15:27+5:302021-06-02T04:15:27+5:30
अधीच दुष्काळ लालपरी अगोदरच अडचणीत असताना लाॅकडाऊनमुळेही मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. नांदेड विभागात दर महिन्याला १६ ते ...

लाॅकडाऊनमधील देखभाल दुरुस्तीमुळे वर्षभराच्या विश्रांतीनंतरही लालपरी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत
अधीच दुष्काळ
लालपरी अगोदरच अडचणीत असताना लाॅकडाऊनमुळेही मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. नांदेड विभागात दर महिन्याला १६ ते १८ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले. परंतु, देखभाल दुरुस्तीवर होणार खर्च मात्र करावा लागला. यामध्ये वर्षभरात लाखो रुपये खर्च करावे लागले.
वर्षातून दोन-तीन महिने रस्त्यावर
मागील मार्च महिन्यात बंद झालेली बससेवा सुरू होण्याच्या मार्गावर असताना पुन्हा कोरोनाने कहर केला. परिणामी लाॅकडाऊन झाले अन् बससेवाही बंद करण्यात आली. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात केवळ तीन महिन्यांपासून काही बसेस रस्त्यावर धावत आहेत.
जिल्ह्यात ९ आगार
एकूण बसेस ६०८
नियमित खर्च सुरूच
बसेस बंद असल्या तरी देखभाल दुरुस्ती आणि तीन दिवसांना एकवेळ बस सुरू करून राऊंड घेण्यात येतो. त्यामुळे प्रत्येक बसवर मेंटेनन्ससाठी किरकोळ खर्च सुरूच आहे. त्यात काही बसचे टायर बदलावे लागत आहेत, तर काही बसच्या इंजिनचेही काम हाती घ्यावे लागत आहे.
लाॅकडाऊनमध्येही बसेस तीन दिवसांत एकवेळ चालू करून एक राऊंड आगारात मारला. त्यामुळे बॅटरी चार्ज राहणे, ऑईल पातळी, इंजिन व्यवस्थित राहण्यासाठी मदत झाली. तसेच वेळोवेळी देखभाल दुरुस्तीही करण्यात आली. परिणामी आज प्रवाशांच्या सेवेसाठी लालपरी रस्त्याने धावत आहे.
अशोक पन्हाळकर, विभाग नियंत्रक, नांदेड.