शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

४३१ अंगणवाड्यांत पाण्याचा, २३१ मध्ये शौचालयांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:16 IST

तालुक्यात चौदावा वित्त आयोगाचा निधी येतो़ बहुतांश ग्रामपंचायती या पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) अंतर्गत येतात़, असे असतानाही किनवट पं. स. अंतर्गतच्या ४२९ अंगणवाडी केंद्रांत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही किंवा नळजोडणी नाही तर २३१ अंगणवाडी केंद्रांना शौचालय नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देकिनवट तालुक्यातील अंगणवाड्या सोयी-सुविधांपासून वंचित

गोकुळ भवरे।किनवट : तालुक्यात चौदावा वित्त आयोगाचा निधी येतो़ बहुतांश ग्रामपंचायती या पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) अंतर्गत येतात़, असे असतानाही किनवट पं. स. अंतर्गतच्या ४२९ अंगणवाडी केंद्रांत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही किंवा नळजोडणी नाही तर २३१ अंगणवाडी केंद्रांना शौचालय नसल्याचे चित्र आहे.किनवट तालुक्यात १९१ गावे, १०५ वाडी-तांडे असताना तालुक्यात एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प किनवटअंतर्गत एकूण ४५३ अंगणवाडी केंद्र कार्यान्वित असून शून्य ते पाच वर्षे वयोगटातील १८ हजार ५०५ बालके आहेत़ स्वत:च्या इमारती असलेल्या ३४७ अंगणवाडी असून सात अंगणवाड्या या भाड्याच्या इमारतीत भरतात. तर आठ अंगणवाड्या व्हरांड्यात भरतात़ दोन अंगणवाड्या देवळात व चौदा अंगणवाड्या खासगी ठिकाणी भरतात़ तसेच ७५ अंगणवाड्या या समाजमंदिर, शाळा, वाचनालय इत्यादी ठिकाणी भरविल्या जातात. ४२९ अंगणवाड्यांत पिण्याच्या पाण्याची सोय नाही़ नळ कनेक्शन नाही, २३१ अंगणवाड्यांत शौचालय नाही, ४१४ अंगणवाड्यांत पाणी शुद्धीकरण उपलब्ध नाही़ ४४३ अंगणवाड्यांना विद्युत पुरवठा नाही़ दहा अंगणवाड्यांत १० विद्युत पुरवठा दिला आहे़ मात्र मीटरच बसवण्यात आले नसल्याची माहिती आहे़किनवट प्रकल्पात पंधरा बिट आहेत़ अंगणवाड्यांवर पर्यवेक्षिका नियंत्रण ठेवतात़ तालुक्यात पेसा व चौदावा वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना येतो़ अंगणवाडी सारख्या केंद्राकडे ग्रामपंचायती म्हणावे तसे लक्ष देत नाहीत, म्हणूनच की काय अंगणवाड्यात समस्यांचा अभाव आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे़ ज्या कामात नफा त्याच कामावर ग्रामपंचायतीचा भर आहे,असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

आपण उपरोक्त सुविधा ग्रामपंचायतीने पेसा व चौदावा वित्त आयोग या निधीतून करावे, असे पंचायत समिती कार्यालयाला कळविले आहे -प्रफुल्ल बागल, बालविकास प्रकल्प अधिकारी, किनवटबालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सूचवल्याप्रमाणे आपण सर्व ग्रामसेवकांना उपरोक्त कामे पेसा व चौदावा वित्त आयोगाधून करण्याच्या सूचना दिल्या आहेत - पी क़े़ नारवटकर, बीडीओ पंचायत समिती किनवट़

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान