नगराध्यक्षपदी कुलकर्णी , अडसूळ
By Admin | Updated: July 9, 2014 00:11 IST2014-07-08T23:48:42+5:302014-07-09T00:11:45+5:30
हदगाव/धर्माबाद : हदगाव पालिकेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे अमित अडसूळ आणि धर्माबादच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे विनायकराव कुलकर्णी यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले.

नगराध्यक्षपदी कुलकर्णी , अडसूळ
हदगाव/धर्माबाद : हदगाव पालिकेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे अमित अडसूळ आणि धर्माबादच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे विनायकराव कुलकर्णी यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले. दरम्यान, अर्धापूर
नगरपंचायतमध्ये दोन उमेदवारांचे अर्ज असल्याने येथे चुरस निर्माण झाली आहे.
धर्माबादेत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ८ जुलै रोजी माजी नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीच्या सत्तेत सतत साडेचार वर्षात चौथ्यांदा नगराध्यक्षपद रत्नाळीकडे गेल्याने बाळापूरवासियांत नाराजी व्यक्त होत आहे. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे १५ आणि कॉंग्रेसचे तीन असे पक्षीय बलाबल आहे. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण धरमकर, मुख्याधिकारी निलेश सुंकावार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
हदगाव : येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदी विद्यमान गटनेते अमित अडसूळ यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे चित्र ८ जुलै रोजी स्पष्ट झाले. १४ जुलै रोजी नगराध्यक्षपदाची औपचारिक घोषणा होईल.
नगराध्यक्षपदासाठी मंगलाताई मुधोळकर, अमित अडसूळ यांच्या नावाची चर्चा होती. शेवटच्या टप्प्यात माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव देशमुख यांचेही नाव चर्चेत आले. यात अमित अडसूळ यांनी बाजी मारली, त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले. पीठासन अधिकारी म्हणून भोकरचे उपविभागीय अधिकारी केशव नेटके व तहसीलदार संतोष गोरड यांनी काम पाहिले. १४ जुलै रोजीच पालिका उपाध्यक्षपदाचीही घोषणा होईल. दरम्यान, अडसूळ यांचे नामननिर्देशनपत्र दाखल करताना युवक काँग्रेसचे केदार पाटील - साळुंके, बाबूराव पाथरडकर, जाकेर चाऊस, अनिल पाटील, सुनील सोनुले, खदीर खॉं, सुहास शिंदे, अहेमद पटेल, आनंद कांबळे, बाबूअण्णा पिचकेवार आदीही उपस्थित होते.
(वार्ताहर)
अर्धापूरला नगराध्यक्षपदासाठी चुरस
अर्धापूर: येथील नगरपंचायतच्या अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसकडून नासेरखान पठाण तर राष्ट्रवादीकडून प्रकाश सरोदे यांचा अर्ज दाखल झाल्याने चुरस निर्माण होणार आहे.पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. कॉंग्रेस १४ व राष्ट्रवादीचे ३ असे पक्षीय बलाबल नगरपंचायतमध्ये आहे.
वरच्या स्तरावर राष्ट्रवादी व कॉंग्रेसची आघाडी असताना पूवीरच्या अडीच वर्षांत कॉंग्रेसच्या हाती सत्ता असताना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचार, अनोगोंदी कारभार याकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही निवडणुकीत उतरलो असून, बहुमतासाठी प्रयत्नशील आहोत- किशोर देशमुख, विरोधी पक्षनेते, अर्धापूर
माहुरात तिघांचे अर्ज
माहूरचे नगराध्यक्षपद अनु. जातीसाठी राखीव आहे. यासाठी तीन जणांनी नामांकनपत्र दाखल केले. कॉंग्रेसकडून गौतमी कांबळे, शिवसेनेकडून बालाजी वाघमारे तर अपक्ष म्हणून शिवलिंग टाकळीकर यांनी अर्ज भरला. पालिकेत चार शिवसेना, एक अपक्ष, तीन राष्ट्रवादी, कॉंग्रेस ९ असे पक्षीय बलाबल आहे. कॉंग्रेसचे शिवलिंग टाकळीकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने सर्वांचेच गणित बिघडले आहे. नगराध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.