कृष्णूरची इंडिया मेगा करणार शेतकऱ्याच्या भुईमूगाची थेट खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:17 IST2021-04-15T04:17:22+5:302021-04-15T04:17:22+5:30

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून भुईमूगाच्या शेंगाची खरेदी करुन ऑईल मिल मध्ये वेगवेगळी प्रक्रिया करून भुईमूगाच्या शेंगाचे टरफल व शेंगदाणा वेगवेगळे ...

Krishnur's India Mega will make direct purchase of farmers' groundnuts | कृष्णूरची इंडिया मेगा करणार शेतकऱ्याच्या भुईमूगाची थेट खरेदी

कृष्णूरची इंडिया मेगा करणार शेतकऱ्याच्या भुईमूगाची थेट खरेदी

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून भुईमूगाच्या शेंगाची खरेदी करुन ऑईल मिल मध्ये वेगवेगळी प्रक्रिया करून भुईमूगाच्या शेंगाचे टरफल व शेंगदाणा वेगवेगळे करणे. तसेच शेंगदाण्यापासून कच्चे तेल तयार करणे त्या कच्च्या तेलास रिफाईंड करून ते बाजारात विकण्यात येते.

कृष्णूर येथील इंडिया मेगा कंपनीही सोयाबीन, ज्वारी, हरभरा, तसेच पक्की व कची हळद खरीदी करीत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकरी आपल्या शेतातील माल कंपनीला थेट आणून विक्री करत आहेत. काही दिवसातच भुईमूग पिकाची काढणी चालू होणार आहे

शेतकऱ्याचा माल खरीदी करण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत मार्केट बंद असल्याने सदरचा माल शेतकऱ्याला बाजारात घेऊन जाणे होत नाही व कमी भाव लागतो सदरच्या कंपनीने शेतकऱ्याच्या मालाला दर्जेदार भाव देऊन थेट भुईमूग पिकाची खरीदी करणार असल्याचे सांगितले आहे.

शेतकरी बांधवांनी भुईमूगाची काढणी झाल्याच्या नंतर इंडिया मेगा ऍग्रो कंपनीला द्यावेत व विक्री करावी. शेतकऱ्याच्या मालाला येथे चांगली किंमत मिळेल असा विश्वासही त्यांनी दिला. (वाणिज्य वार्ता)

Web Title: Krishnur's India Mega will make direct purchase of farmers' groundnuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.