शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

किवळा प्रकल्प जलसंपदामार्फतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 00:39 IST

तालुक्यातील किवळा येथील साठवण तलाव जलसंपदा विभागाच्या निधीतूनच करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे़ महापालिकेने या तलावासाठीच्या खर्चास असमर्थतता दर्शविल्यानंतर शासनाकडे फेरप्रस्ताव सादर केला होता़

ठळक मुद्देमनपाने दर्शविली होती खर्च करण्यास असमर्थता

नांदेड : तालुक्यातील किवळा येथील साठवण तलाव जलसंपदा विभागाच्या निधीतूनच करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे़ महापालिकेने या तलावासाठीच्या खर्चास असमर्थतता दर्शविल्यानंतर शासनाकडे फेरप्रस्ताव सादर केला होता़ १६़७३ दलघमी पाणीसाठा या तलावात होणार असून याचा लोहा आणि नांदेड तालुक्यातील गावांना सिंचनासाठी लाभ मिळणार आहे़राज्य शासनाच्या सुधारित जलनियोजनानुसार विष्णूपुरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात किवळा साठवण तलाव बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ विष्णूपुरी प्रकल्पाच्या मान्यताप्राप्त जलनियोजनानुसार विष्णूपुरी बंधारा स्थळी केंद्रिय जल आयोगाने मान्यता दिलेल्या ११़४० अब्ज घनफूट पाणीवापराऐवजी केवळ ४़१० अब्ज घनफूट पाण्याचाच वापर होत आहे़ शिल्लक ७़३० अब्ज घनफूट पाण्याचा वापर करण्यासाठी गोदावरी नदीवर विष्णूपुरी प्रकल्पाच्या भाग २ अंतर्गत बंधाऱ्यांची श्रृंखला प्रस्तावित करण्यात आली आहे़ किवळा साठवण तलावात १६़७३ दलघमी उपयुक्त जलसाठा अपेक्षीत आहे़ यापैकी सिंचनासाठी ३़३५ आणि बिगरसिंचनाकरिता १२ दलघमी पाणी वापरले जाणार आहे़पावसाळ्यात विष्णूपुरीतून तेलंगणा राज्यात वाहून जाणारे हक्काचे पाणी उपसा करून किवळा साठवण तलावात सोडले जाणार आहे़ विष्णूपुरी प्रकल्पास पुरक साठवण व्यवस्था म्हणून हा तलाव उपयोगी राहणार आहे़ तर विष्णूपुरीच्या लाभक्षेत्रात ६७० हेक्टर क्षेत्र नव्याने सिंचनाखाली येणार आहे़ तसेच सिडको व औद्योगिक वसाहतीसाठी १२ दलघमी जलसाठा उपलब्ध होणार आहे़विष्णूपुरी प्रकल्पाच्या प्रस्तावित पंचम सु़प्ऱमा़ नुसार किवळा साठवण तलावाणी एकूण किंमत ४३ कोटी ७६ लाख इतकी आहे़ त्यात भूसंपादनासाठी २७ कोटी आणि कामासाठी १६़७६ लागणार आहे़ बुडीतक्षेताच्या भूमी अधिग्रहणासाठी भूधारकांची सहमती आहे़ भूधारक लाभक्षेत्रातील ६ गावातील शेतकरी, जता व या भागातील लोकप्रतिनिधी प्रकल्प पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आग्रही आहेत़ निधी उपलब्ध झाल्यास जून २०२० पर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षाही जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे़किवळा साठवण तलावाच्या कामासाठी १४ कोटी ६१ लाख रूपये किंमतीची निविदा मंजूर झालेली आहे़ कार्यारंभ आदेशही ११ नोव्हेंबर २०१३ रोजी देण्यात आले आहेत़ या तलावाच्या बुडीत क्षेत्रासाठी बाभुळगाव, किवळा व ढाकणी या तीन गावातील १४७ हेक्टर जमीन लागणार आहे़ तीनही गावांतील जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे़ भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात २५ टक्के रक्कम अर्थात ४ कोटी ७५ लाख रूपये मागणी करण्यात आली असल्याने प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :NandedनांदेडDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प