शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मूतखडा औषधनिर्मिती; जळगावच्या औषध कंपनीचा नांदेडच्या विद्यापीठाला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 14:17 IST

स्वारातीम विद्यापीठाच्या जैवशास्त्र संकुलाने मूतखड्यावरील औषध गोळी स्वरूपात बाजारपेठेत आणण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेतला होता.

ठळक मुद्देजळगाव येथील कलस या औषधनिर्मिती कंपनीशी करार करून विद्यापीठाने मूतखड्यावरील हे औषध बाजारपेठेत आणलेकंपनीने औषध परस्पर बाजारपेठेत विक्री केल्याने विद्यापीठाचे नियम व अटींचे उल्लंघन झाले.

नांदेड : मूतखडा शरीरातच नष्ट करणाऱ्या औषधाची निर्मिती करण्यात नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाला यश आले होते. विद्यापीठाने खाजगी कंपनीसोबत करार करून विद्यापीठातील हे संशोधन थेट बाजारपेठेत आणत राज्यातील अशा पद्धतीचे पहिले विद्यापीठ म्हणून मानही मिळविला होता. मात्र, संबंधित औषध कंपनीने नियम, अटींचे उल्लंघन करीत विद्यापीठालाच गंडा घातल्याने या कंपनीला विद्यापीठाने कायदेशीर नोटीस बजावली आहे.

स्वारातीम विद्यापीठाच्या जैवशास्त्र संकुलाने मूतखड्यावरील औषध गोळी स्वरूपात बाजारपेठेत आणण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेतला होता. सुरुवातीला उंदरावर आणि त्यानंतर १०० रुग्णांवर यशस्वी प्रयोग केल्यानंतर अन्न् व औषध विभागाची परवानगी घेऊन, तसेच भारत सरकारकडून डिसोपॉल या नावाने औषधाचे पेटंट घेऊन जळगाव येथील कलस या औषधनिर्मिती कंपनीशी करार करून विद्यापीठाने मूतखड्यावरील हे औषध बाजारपेठेत आणले होते. परिणामकारकता आणि खाजगी कंपनीच्या तुलनेत स्वस्त असल्यामुळे राज्यभरातून या औषधाला मागणीही वाढली. मात्र, कालांतराने तीन-साडेतीनशे रुपयांना मिळणारे हे औषध ७०० ते ७५० रुपयांना औषधी दुकानातून विकले जाऊ लागले. त्याचवेळी कंपनीने उत्पादन करून ते विद्यापीठाकडे सादर न करता त्याची परस्पर बाजारपेठेत विक्री केल्याने विद्यापीठाचे नियम व अटींचे उल्लंघन झाले. यामुळेच विद्यापीठाने या कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली होती.

नव्या कंपनीसोबत उत्पादन करण्यासाठीचे प्रयत्न स्वारातीम विद्यापीठाने मूतखड्यावरील या औषधासाठी खाजगी कंपनीसोबत करार केला होता. मात्र, त्यांच्याकडून नियम, अटींचे उल्लंघन होत असल्याने नव्या कंपनीसोबत उत्पादन करण्यासाठीचे विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहेत. करार संपल्यानंतर सदर कंपनी हे औषध बाजारात विकत असेल, तर कारवाई करू. -डॉ. उद्धव भोसले, कुलगुरू, स्वारातीम विद्यापीठ, नांदेड

टॅग्स :Nandedनांदेडmedicineऔषधंswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडfraudधोकेबाजी