शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
4
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
5
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
6
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
7
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
8
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
9
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
10
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
11
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
12
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
13
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
14
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
15
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
16
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
17
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
18
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
19
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार

नांदेड जिल्ह्यात अपहृत चिमुरडीची हत्या; मृतदेह विहिरीत सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 6:00 AM

नायगाव तालुक्यातील मांजरम येथील अपहृत सहा वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह शुक्रवारी सकाळी गावाशेजारच्या विहीरीत सापडल्याने खळबळ उडाली.

नरसीफाटा (जि. नांदेड) : नायगाव तालुक्यातील मांजरम येथील अपहृत सहा वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह शुक्रवारी सकाळी गावाशेजारच्या विहीरीत सापडल्याने खळबळ उडाली़ आरोपी श्रावण दशरथ गजभारे हा नातेवाईक असून तो पसार झाला आहे.मांजरम येथील उत्तम पोणीराम वंजारे यांची सहा वर्षाची चिमुकली रितिका ही २० जून रोजी अंगणात खेळत असताना सायंकाळी सहाच्या सुमारास नातेवाईक आरोपी श्रावण दशरथ गजभारे याने मुलीचे बोट धरून तिला नेले़ दोन तास झाले तरी मुलगी परत आली नसल्याने आई वडिलांनी शोधाशोध सुरु केली. तेवढ्यात रितिकाला तिचा नातेवाईक घेवून जात असताना तिच्या चुलत भावाने पाहिले़ कळताच वडिलांनी श्रावणकडे विचारणा केली़ तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने नायगाव ठाणे गाठून वडिलांनी फिर्याद नोंदवली़ यावरून श्रावणविरूद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला़गुन्हा नोंद झाला असला तरी आई वडिलांसह नातेवाईकांनी रितिकाचा शोध घेतला़ आरोपीवरही पाळत ठेवली़ मात्र चिमुरडी सापडण्याअगोरच श्रावण पसार झाला़ आरोपीसह मुलीचाही शोध सुरू असताना शुक्रवारी सकाळी मांजरमशेजारील एका विहिरीत चिमुरडीचा मृतदेह आढळला. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल होईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी दिली़

टॅग्स :Deathमृत्यू