शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

प्रतापराव चिखलीकरांविरुद्ध खतगावकरांचे बंडाचे निशाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:34 IST

लोकसभा निवडणूक निकाल लागून अद्याप महिनाही झालेला नसतानाच भाजपामध्ये गटबाजी उफाळून आली आहे. माजी खासदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी पत्र लिहिले आहे.

नांदेड : लोकसभा निवडणूक निकाल लागून अद्याप महिनाही झालेला नसतानाच भाजपामध्ये गटबाजी उफाळून आली आहे. माजी खासदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी पत्र लिहिले आहे. खा. चिखलीकर हे जाणीवपूर्वक स्वत:च्या ताकदीवर निवडून आल्याचा आव आणीत असल्याचा आरोप करीत पदाधिकाऱ्यांवरही आकसबुद्धीने अन्याय करत असल्याची तक्रार केली आहे. संघटनात्मक बदल आवश्यक असल्यास जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन करावेत अन्यथा पदाचा त्याग करण्याची तयारी असल्याचे खतगावकर यांनी या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.लोकसभा निवडणूक निकाल लागल्यापासून खा. प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्यात धूसफूस सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी खतगावकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच आपली कैफियत मांडली आहे. जागतिक योग दिनानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: शुक्रवारी नांदेडमध्ये आहेत. त्यांनी येण्याच्या पूर्वसंध्येलाच पक्षातील दोन मातब्बर नेत्यांतील ही धूसफूस आता चव्हाट्यावर आली आहे.खतगावकर यांनी या पत्रात नमूद केले आहे की, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य करीत राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत कुठलीही अट न ठेवता भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी अशोकराव चव्हाण यांचे जिल्ह्यातील साम्राज्य खालसा करण्याचा माझा निर्धार होता. माझ्याबरोबर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मंडळी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर, माजी आ. अविनाश घाटे, कै. गोविंदराव राठोड, ओमप्रकाश पोकर्णा, भगवानराव आलेगावकर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी महापौर अजय बिसेन, माजी जि.प. अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, खुशाल पाटील उमरदरीकर व बालाजी पाटील अंबुलगेकर यांच्यासह सभापती गणेशराव पाटील करखेलीकर आदी प्रमुख नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश घडवून आणला. मागील पाच वर्षांपासून पक्षावर निष्ठा ठेवून कार्यरत राहिलो. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुका जिद्दीने एकसंघ राहून लढल्या. यामुळेच यातील कुंडलवाडी, मुखेड नगरपालिका, मुखेड, देगलूर, धर्माबाद बाजार समिती आणि बिलोली पंचायत समितीत भाजपचा झेंंडा फडकला.मात्र प्रताप पाटील चिखलीकर हे २०१४ मध्ये माझ्याबरोबर मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपा श्रेष्ठींना माझ्या साक्षीने पक्षप्रवेशाचा शब्द दिला होता. मात्र त्यानंतर भाजपावर अविश्वास दाखवून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची आठवण खतगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पत्राद्वारे करुन दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ऐन दौºयाच्या तोंडावर भाजपातील ही खदखद बाहेर आल्याने पक्षाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.तर विधानसभेत भाजपाला नाराजी भोवेलखतगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी चिखलीकर यांचा मित्रमंडळीलाच संघटनेची प्रमुख पदे मिळावीत, असा अट्टहास दिसतो. विधानसभा निवडणुकीच्या तिकिटाचे वाटपदेखील मीच करणार, असे सांगत चिखलीकर हे इच्छुकांना आपल्या मागे-पुढे झुलवत ठेवण्याचे धोरण अवलंबित असल्याचा आरोप खतगावकर यांनी केला आहे. या वृत्तीला वेळीच आवर न घातल्यास भाजपातील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची नाराजी आगामी विधानसभा निवडणुकीत जाणवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही खतगावकर यांनी दिला आहे.शेवटपर्यंत भाजपामध्येच राहणार-खतगावकरमाजी खा. खतगावकर यांनी या पत्रात नांदेड जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाºयांच्या हितासाठी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा त्याग करण्याची तयारीही दाखविली आहे. महानगराध्यक्ष डॉ.संतुक हंबर्डे यांचा राजीनामा घेऊन माझ्या विचाराचा महानगराध्यक्ष करणार असल्याचे खा. चिखलीकर सांगत आहेत. ते पक्षश्रेष्ठीच्या दृष्टीने योग्य नाही. संघटनात्मक बदलाचे काही निर्णय घेणे श्रेष्ठींना आवश्यक वाटल्यास जिल्ह्यातील प्रमुख कोअर ग्रुपला विश्वासात घेऊन याबाबत निर्णय घ्यावा, असे नमूद करीत मी स्वत: शेवटपर्यंत भाजपामध्येच राहणार असल्याचे स्पष्ट करीत स्वत:च्या व्यक्तिगत स्वार्थासाठी इतर पदाधिकाºयांचा बळी देणे कितपत योग्य आहे? असा प्रश्नही खतगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

टॅग्स :NandedनांदेडBJPभाजपा