शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

दागिने काढून ठेवा; नाही तर बक्षीस मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:43 IST

गोकुळनगर भागातील महालक्ष्मी आॅईल शो रुमच्या समोर एका महिलेला अडवून तिच्याजवळील पिशवीची अदलाबदल करुन १५ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली़

ठळक मुद्देमहिलेला गंडविले पंधरा हजार रुपयांचे दागिने लंपास

नांदेड : गोकुळनगर भागातील महालक्ष्मी आॅईल शो रुमच्या समोर एका महिलेला अडवून तिच्याजवळील पिशवीची अदलाबदल करुन १५ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली़ आमच्या मालकाला मुलगा झाला आहे़ त्यामुळे ते गरीब महिलांना बक्षीस वाटप करीत आहेत़ आपणही या पण तुमच्याजवळील दागिने काढून ठेवा़ असे म्हणत भामट्याने महिलेला गंडा घातला़मंगळवारी दुपारी आंबेडकरनगर भागातील महिला रमा महादळे ही कामानिमित्त गोकुळनगर भागात आली होती़ महालक्ष्मी आॅईल शो रुमच्या समोर त्या आल्या असताना समोरुन आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना अडविले़ रस्त्याच्या कडेला नेले़ आमच्या मालकांना मुलगा झाला आहे़ त्यामुळे खूप खूश होवून ते गरीब महिलांना बक्षीस वाटप करीत आहेत़ तुम्ही तुमच्याजवळचे दागिने काढून पिशवीत टाका अन् दुकानासमोर या, तुम्हालाही बक्षीस मिळेल असे सांगितले़बक्षीस मिळणार या आमिषाने महिलेने कानातील, गळ्यातील व रोख ५०० रुपये एका पिशवीत टाकले़ त्याचवेळी आरोपीने महिलेजवळच्या पिशवीची अदलाबदल केली़ त्यानंतर महिला समोर गेली असताना तिथे कुणीही दुकानदार बक्षीस वाटप करीत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले़ पिशवीतील दागिनेही गायब झाले होते़त्यानंतर परत महादळे या आॅईल शो रुम समोर आल्या़ परंतु चोरटा पसार झाला होता़ ही बाब कुटुंबियांना कळविल्यानंतर सायंकाळी या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ सदरील भामट्याचा पोलीस शोध घेत आहेत़

टॅग्स :NandedनांदेडtheftचोरीWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीस