शहर वाहतूक शाखेने टाकली कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST2021-06-06T04:14:36+5:302021-06-06T04:14:36+5:30
नांदेड शहरातील रस्त्यांच्या गुंतागुंतीमुळे या ठिकाणी वाहतुकीची समस्या ही कायम डोकेदुखी ठरत आली आहे. त्यातच बेशिस्त वाहनधारकांमुळे त्यात भरच ...

शहर वाहतूक शाखेने टाकली कात
नांदेड शहरातील रस्त्यांच्या गुंतागुंतीमुळे या ठिकाणी वाहतुकीची समस्या ही कायम डोकेदुखी ठरत आली आहे. त्यातच बेशिस्त वाहनधारकांमुळे त्यात भरच पडत आहे. वाहतूक शाखेकडे असलेले अपुरे मनुष्यबळ आणि साधनांची वानवा त्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी आता वाहतूक शाखेकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक शाखेला ६० लोखंडी बॅरिकेट्स, १२० कार व दुचाकी जॅमर, ५० प्लास्टिक कोन बॅरिकेट्स, २०० बॅटन, २०० रिफ्लेक्टेड जॅकेट देण्यात आले आहेत. फटका बुले, विनाक्रमांक आणि फॅन्सी क्रमांक असलेले दुचाकीस्वार पोलीस दिसताच वाहनाजवळ येत नाहीत. त्यामुळे अशा वाहनांना आता जॅमर लावण्यात येणार आहे. बाजारपेठेत वाहनधारक बेशिस्तपणे कुठेही चारचाकी वाहने पार्क करतात. त्यांच्यावर कारवाई करणे आता सोेपे जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिली.