शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

कामजळकेवाडीकरांनी पाण्यासाठी रचली चिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:59 PM

लोहा तालुक्यातील कामजळकेवाडी येथील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पाईपलाईन तत्काळ करावी, सिंचनाच्या पाण्यासाठी नवीन लघू सिंचन प्रकल्पाची निर्मिती करावी, या मागणीकडे संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी

माळाकोळी : लोहा तालुक्यातील कामजळकेवाडी येथील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पाईपलाईन तत्काळ करावी, सिंचनाच्या पाण्यासाठी नवीन लघू सिंचन प्रकल्पाची निर्मिती करावी, या मागणीकडे संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी २५ मार्च रोजी गावातील महादेव मंदिरासमोर सामूहिक आत्मदहन करण्याच्या हेतूने सरण रचले़ पोलिसांनी लगेच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.कामजळकेवाडी गावची लोकसंख्या ३०० आहे. गावात पाण्याची सोय नसल्याने ग्रामस्थांना भटकंती करावी लागते. यासंदर्भात संबंधितांचे वारंवार लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी ७ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून उपरोक्तप्रमाणे आंदोलन करण्याचा निर्णय कळविला होता. सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर माऊली गीते यांच्या मार्गदर्शनाखाली गावकरी २५ मार्च रोजी एकत्र जमले. गावातील महादेव मंदिरासमोर त्यांनी सरण रचले होते़ मात्र पोलिसांनी लगेच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

टॅग्स :Nandedनांदेडagitationआंदोलनwater scarcityपाणी टंचाई