शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या मागणीसाठी जमिअत ए उल्माची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:18 IST

मुस्लिम समाजातील एकूण ५० प्रवर्गाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने २०१४ मध्ये केला होता़ परंतु, त्यानंतरही मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात आले नाही़ या विरोधात जमिअत ए उल्मा संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले़

ठळक मुद्देआंदोलन : विशेष मागासप्रवर्ग निर्माण करुन आरक्षणाची मागणी

नांदेड : मुस्लिम समाजातील एकूण ५० प्रवर्गाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने २०१४ मध्ये केला होता़ परंतु, त्यानंतरही मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात आले नाही़ या विरोधात जमिअत ए उल्मा संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते़सरकारने सच्चर समिती नियुक्ती करुन देशातील धार्मिक अल्पसंख्याक वर्गाच्या स्थितीचे विश्लेषण व तपशीलवार अभ्यास पूर्ण केला होता़ त्यानंतर डॉ़ रहेमान समितीने २०१३ मध्ये राज्य शासनाच्या सेवा व शैक्षणिक संस्थामध्ये मागास मुस्लिमांसाठी आठ टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती़मुंबई उच्च न्यायालयानेसुद्धा मुस्लिम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्याबाबत निवाडा दिला होता़ राज्यात शैक्षणिक व सामाजिक मागासलेल्या समाजासाठी घटनेतील तरतुदीनुसार विशेष मागास प्रवर्ग (अ) निर्माण करुन त्यामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम गटाचा समावेश करावा़ शासकीय, निमशासकीय भरतीमध्ये सध्या राज्यात अस्तित्वात असलेल्या आरक्षणाव्यतिरिक्त पाच टक्के आरक्षण नव्याने निर्माण करण्यात आलेल्या विशेष मागासप्रवर्ग- अ या प्रवर्गाला देण्यात यावे़यासह इतर मागण्यांसाठी जमिअत ए उल्माच्या वतीने निदर्शने करण्यात आली़ यावेळी खारी महमंद असद, सिद्दी सलीम देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते़ दरम्यान, याच मागणीसाठी कंधारसह किनवट येथेही आंदोलन करुन मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने आरक्षणाची मागणी करण्यात आली़ आंदोलकांच्या ‘एकही मिशन-मुस्लिम आरक्षण’ या घोषणेने परिसर दुमदुमून गेला. आंदोलनात डॉ. गुलाम गफार, आबीद खॉन, शे. ईस्माईल, शेख याकुब, शेरूभाई, मुस्तफा खान पठाण, संजय भोसीकर आदींचा समावेश होता. तर किनवट येथे ही मोठ्या संख्येने समाजबांधवांनी निदर्शनात सहभाग घेतला़

टॅग्स :Nandedनांदेडreservationआरक्षणMuslimमुस्लीमagitationआंदोलन