आजपासून सुरू होणार जम्बो कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:15 IST2021-04-19T04:15:57+5:302021-04-19T04:15:57+5:30
जिल्ह्यात दररोज १,२०० हून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे खासगी आणि सर्व शासकीय रुग्णालये सध्या हाऊसफुल्ल आहेत. नांदेडमध्ये बेड ...

आजपासून सुरू होणार जम्बो कोविड सेंटर
जिल्ह्यात दररोज १,२०० हून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे खासगी आणि सर्व शासकीय रुग्णालये सध्या हाऊसफुल्ल आहेत. नांदेडमध्ये बेड मिळत नसल्याने अनेक रुग्णांना हैदराबाद गाठावे लागत आहे. तर उपचारासाठी विलंब झाल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील भक्ती लॉन्स येथे २०० खाटांच्या जम्बो कोविड सेंटरचे काम आठ दिवसांपूर्वी हाती घेतले होते. सध्या इथे १९० ऑक्सिजन बेड आहेत. डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नेमणूकदेखील करण्यात आली. ऑक्सिजनचे १०० सिलिंडर उपलब्ध झाले असून रविवारी सायंकाळपर्यंत आणखी १०० सिलिंडर मिळणार आहेत. त्यानंतर सोमवारी सकाळपासून इथे उपचारासाठी रुग्ण दाखल केले जाणार आहेत. हे जम्बो कोविड सेंटर सुरू झाल्याने रुग्णांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.