पत्रकाराला केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:18 IST2021-04-07T04:18:20+5:302021-04-07T04:18:20+5:30

कोरोनामुळे कुटुंब शेतात अन् चोरटे शिरले घरात नांदेड- कोरोनाचा सद्या उद्रेक सुरु आहे. घरात एकाला कोरोना झाल्यानंतर अख्खे कुटुंबच ...

Journalist beaten | पत्रकाराला केली मारहाण

पत्रकाराला केली मारहाण

कोरोनामुळे कुटुंब शेतात अन् चोरटे शिरले घरात

नांदेड- कोरोनाचा सद्या उद्रेक सुरु आहे. घरात एकाला कोरोना झाल्यानंतर अख्खे कुटुंबच बाधित होत आहे. त्यामुळे त्यांना विलगीकरणात रहावे लागत आहे. अशात काही कुटुंबे ही शेतातील आखाड्यावरुन जावून राहत आहेत. याच संधीचा फायदा घेण्यास चोरट्यांनी आता सुरुवात केली आहे. हिमायतनगर शहरात तशी घटनाही घडली आहे.

जय जीवनराव शिंदे यांच्या वडीलांचे कोरोनामुळे निधन झाले होते. परिसरातील इतरांना कोरोनाची लागण होवू नाही म्हणून शिंदे हे कुटुंबासह ४ एप्रिल रोजी शेतातील आखाड्यावर राहण्यासाठी गेले होते. याच दरम्यान चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण ३ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. शेजार्यांनी ही बाब कळविल्यानंतर या प्रकरणात हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोउपनि देवकत्ते हे करीत आहेत.

Web Title: Journalist beaten