एक महिना झाला नळाला पाणीच नाही : ग्रामस्थांनी पाणी आणावे कुठून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST2021-06-02T04:15:30+5:302021-06-02T04:15:30+5:30

हदगाव ‌- मनाठा येथील मुख्यमंत्री पेयजल योजना एक महिन्यापासून बंद आहे. योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे; परंतु एक महिन्यापासून ...

It's been a month since there was no running water: where should the villagers fetch water from? | एक महिना झाला नळाला पाणीच नाही : ग्रामस्थांनी पाणी आणावे कुठून

एक महिना झाला नळाला पाणीच नाही : ग्रामस्थांनी पाणी आणावे कुठून

हदगाव ‌- मनाठा येथील मुख्यमंत्री पेयजल योजना एक महिन्यापासून बंद आहे. योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे; परंतु एक महिन्यापासून नळाला पाणी आलेच नाही. ग्रामस्थांनी पाणी आणावे कुठून? पाच वर्षांपासून योजनेचे काम सुरू आहे. व्हाॅल्व्हचे काम आतापर्यंत का केले नाही, असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत.

१ मे रोजी नळयोजना सुरू केली तेव्हापासून एक-दोनदा पाणी आले; पण पुन्हा जे बंद झाले ते जून लागला, पण नळाला पाणी आलेच नाही. एका शेतकऱ्याने काम अडविले होते, त्यामुळे व्हॉल्व्ह बसविले नाहीत; पण ट्रायल घेतल्यानंतर पाइपलाइन फुटू लागल्याने त्यांना साक्षात्कार झाला की, व्हॉल्व्ह बसवावेच लागतात आणि त्यांनी व्हॉल्व्ह बसविले. आता २१ दिवस काम पक्के होईपर्यंत पाणी सोडता येणार नाही, म्हणजे उन्हाळा संपतो. एक-दोन मोठे पाऊस झाले की खाजगी बोअरला पाणी येते. मग नळाला पाणी आले काय, नाही काय कोण विचारणार? सन २०१२ पासूनचा अनुभव आहे. एप्रिल-मे महिन्यात गावात पाणीटंचाई निर्माण होते. त्याअनुषंगानेच नियोजन करणे आवश्यक आहे; पण तसे झाले नाही.

पाण्याची तीव्र टंचाई असताना बीडीओ, तहसीलदार यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे; पण कोणीच योजनेकडे लक्ष देत नाही, संबंधितांना जाब विचारत नाहीत किंवा पर्यायी व्यवस्था म्हणून टँकर किंवा खाजगी बोअर अधिग्रहण करीत नाहीत.

Web Title: It's been a month since there was no running water: where should the villagers fetch water from?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.