लकी ड्रॉ काढून रुग्णाला इंजेक्शन देण्याची आली वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:16 IST2021-04-19T04:16:14+5:302021-04-19T04:16:14+5:30
चौकट------------------- डॉक्टर करताहेत नातेवाइकांचे समुपदेशन गंभीर रुग्णांच्या नातेवाइकांकडून रेमडेसिविर इंजेक्शनसाठी आग्रह धरला जातो. मात्र, प्रत्येकालाच हे इंजेक्शन आवश्यक नाही. ...

लकी ड्रॉ काढून रुग्णाला इंजेक्शन देण्याची आली वेळ
चौकट-------------------
डॉक्टर करताहेत नातेवाइकांचे समुपदेशन
गंभीर रुग्णांच्या नातेवाइकांकडून रेमडेसिविर इंजेक्शनसाठी आग्रह धरला जातो. मात्र, प्रत्येकालाच हे इंजेक्शन आवश्यक नाही. शिवाय या इंजेक्शनचे साईड इफेक्टस्ही अधिक आहेत. रेमडेसिविरशिवाय अन्य औषधे रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळेच विनाकारण मागणी करणाऱ्या नातेवाइकांचे डॉक्टरांकडून समुपदेशन करण्यात येत आहे.
चौकट----------------
नांदेडला नागपूर, लातूरहून पुरवठा
रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी जास्त आहे. त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने नातेवाइकांची धावाधाव होते. नांदेडसाठी हे इंजेक्शन नागपूर, तसेच लातूरहून आणले जाते. याबरोबरच पुण्याहूनही राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो. मात्र, पुण्याहून पुढील दोन दिवस इंजेक्शन येणार नसल्याने रेमडेसिविरचा तुटवडा वाढू शकतो.
चौकट------------
गरज असेल तरच इंजेक्शन द्या
रुग्णांबरोबर नातेवाइकांकडून या इंजेक्शनसाठी आग्रह धरला जातो. प्रत्यक्षात मोजक्याच रुग्णांना या इंजेक्शनची गरज असते. याबरोबरच या इंजेक्शनशिवाय इतर स्टिराईड उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे नातेवाइकांचे समुपदेशन करा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने रुग्णालयांना दिले आहेत.