शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

International Yoga Day: नांदेडकरांनी केले योगातील सहभागाचे रेकॉर्ड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 03:47 IST

‘गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र : मुख्यमंत्री, रामदेव बाबांचा सहभाग

नांदेड : आंतरराष्ट्रीय योग दिनीनिमित्त शुक्रवारी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय योग शिबिराच्या निमित्ताने अवघी नांदेड नगरी योगमय झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगगुरु स्वामी रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत झालेल्या या शिबिरात सुमारे लाखभर विद्यार्थी-नागरिकांनी सहभाग नोंदविला. या शिबिराने ‘गोल्डन बुक आॅफ रेकॉर्ड’चे प्रमाणपत्रही मिळविले. योगाच्या माध्यमातून आपले जीवन कायमस्वरुपी निरोगी व आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न करू या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. तसेच शरीर व मन निरोगी राहिल्याने जीवनमानातही वाढ होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात नियमित योगासने करुन आपले जीवन आरोग्यदायी व सुखकर बनविण्याचे आवाहन रामदेवबाबा यांनी केले. यावेळी आयुष विभागाने तयार केलेल्या ‘पवनी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.जागतिक विक्रमएकाचवेळी एकाच ठिकाणी ९१ हजार ३२३ लोकांनी योगासने करण्याचा पूर्वीचा जागतिक विक्रम नांदेडमधील राज्यस्तरीय शिबिराने मोडला. नांदेडमध्ये एक लाख दहा हजारापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी एकाच ठिकाणी रामदेवबाबा यांनी योग विद्येचे प्रशिक्षण दिले. गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डचे प्रतिनिधी मनीष बिष्णोई यांनी ड्रोनद्वारे प्राथमिक गणना करून ही माहिती पुरविली.गडकरींनीही केला योगानागपूर महापालिका आणि नेहरू युवा केंद्र संघटनेतर्फे यशवंत स्टेडियमवर सामुहिक योगाभ्यास शिबिर पार पडले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भ्रमरी प्राणायाम, अनुलोम विलोम, पद्मासन व विविध योगाची आसने केली. ओंकाराचा गजर केला आणि सामूहिक शांतीमंत्रसुद्धा म्हटला.

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBaba Ramdevरामदेव बाबा