जिल्ह्यातील ३९ हजार शेतकऱ्यांना २२ कोटींचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST2021-05-16T04:16:51+5:302021-05-16T04:16:51+5:30

शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यावेळी कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसानभरपाईसाठी दावा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ...

Insurance of Rs 22 crore to 39,000 farmers in the district | जिल्ह्यातील ३९ हजार शेतकऱ्यांना २२ कोटींचा विमा

जिल्ह्यातील ३९ हजार शेतकऱ्यांना २२ कोटींचा विमा

शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यावेळी कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसानभरपाईसाठी दावा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या ६९ हजार ६६४ शेकऱ्यांना ६५ कोटी ५० लाख रुपयांची भरपाई मिळाली होती. यासोबतच काढणीपश्चात नुकसान झालेल्या १२ हजार ३६९ शेतकऱ्यांना १० कोटी ४३ लाख असे एकूण ७५ कोटी ८४ लाखांची भरपाई मिळाली होती.

चौकट.......

आतापर्यंत एका लाखावर शेतकऱ्यांना विमा

विम्याच्या रकमेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना उत्पन्न आधारित नुकसानभरपाईची प्रतीक्षा होती. यात जिल्हा परिषद, कृषी विभाग व महसूल आशा तीन यंत्रणेने काढलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर जिल्ह्यातील ३९ हजार २६९ शेतकऱ्यांना २१ कोटी ९८ लाख ९१ हजार रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक लाख २१ हजार ६०२ शेतकऱ्यांना ९७ कोटी ९१ लाख ३५ हजार ९४६ रुपये विमा मंजूर झालेला आहे.

माहूर व लोहा तालुक्यांचा आहे अपवाद

उत्पन्न आधारित विमा नुकसानभरपाईमध्ये जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी माहूर, तसेच लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. तालुक्यात कापणी प्रयोगाच्या आधारे उत्पादकता चांगली आल्यामुळे माहूर, तसेच लोहा तालुक्यांना उत्पन्न आधारित नुकसानभरपाई मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

६१३ कोटी ५५ लाख रुपयांचा प्रीमियम जमा...

खरीप हंगाम २०२० मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नऊ लाख ५५ हजार ८०० शेकऱ्यांनी सहभाग घेऊन पिकासाठी ४४ कोटी ६८ लाख २२ हजार ४५८ रुपयांचा विमा हप्ता भरला. तसेच राज्य शासनाचा हिस्सा २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार ७१२ व केंद्र शासनाचा हिस्सा २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार २१८ असा एकूण ६१२ कोटी ५५ लाख ६९ हजार ८८४ रुपये कंपनीकडे प्रीमियम जमा झाला होता. शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यावेळी कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसानभरपाईसाठी दावा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या ६९ हजार ६६४ शेकऱ्यांना ६५ कोटी ५० लाख रुपयांची भरपाई मिळाली होती. यासोबतच काढणीपश्चात नुकसान झालेल्या १२ हजार ३६९. शेतकऱ्यांना १० कोटी ४३ लाख असे एकूण ७५ कोटी ८४ लाखांची भरपाई मिळाली होती.

चौकट.......

आतापर्यंत एका लाखावर शेतकऱ्यांना विमा

विम्याच्या रकमेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना उत्पन्न आधारित नुकसानभरपाईची प्रतीक्षा होती. यात जिल्हा परिषद, कृषी विभाग व महसूल आशा तीन यंत्रणेने काढलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर जिल्ह्यातील ३९ हजार २६९ शेतकऱ्यांना २१ कोटी ९८ लाख ९१ हजार रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक लाख २१ हजार ६०२ शेतकऱ्यांना ९७ कोटी ९१ लाख ३५ हजार ९४६ रुपये विमा मंजूर झालेल्या आहे.

माहूर व लोहा तालुक्यांचा आहे अपवाद

उत्पन्न आधारित विमा नुकसानभरपाईमध्ये जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी माहूर, तसेच लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. तालुक्यात कापणी प्रयोगाच्या आधारे उत्पादकता चांगली आल्यामुळे माहूर, तसेच लोहा तालुक्यांना उत्पन्न आधारित नुकसानभरपाई मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

६१३ कोटी ५५ लाख रुपयांचा प्रीमियम जमा...

खरीप हंगाम २०२० मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नऊ लाख ५५ हजार ८०० शेकऱ्यांनी सहभाग घेऊन पिकासाठी ४४ कोटी ६८ लाख २२ हजार ४५८ रुपयांचा विमा हप्ता भरला. तसेच राज्य शासनाचा हिस्सा २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार ७१२ व केंद्र शासनाचा हिस्सा २८४ कोटी ४३ लाख ८३ हजार २१८ असा एकूण ६१२ कोटी ५५ लाख ६९ हजार ८८४ रुपये कंपनीकडे प्रीमियम जमा झाला होता.

Web Title: Insurance of Rs 22 crore to 39,000 farmers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.