बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST2021-06-04T04:15:18+5:302021-06-04T04:15:18+5:30

बोथी, तुराटीला भेट उमरी - तालुक्यातील बोळी आणि तुराटी गावांना उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार माधवराव बोथीकर ...

Installation of Buddha statue | बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना

बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना

बोथी, तुराटीला भेट

उमरी - तालुक्यातील बोळी आणि तुराटी गावांना उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार माधवराव बोथीकर यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. दोन्ही गावांना वादळी वारे व पावसाचा तडाखा बसला होता. नुकसानीचे पंचनामे तयार करून अहवाल सादर केला जावा अशा सूचना खल्लाळ यांनी यावेळी दिल्या. यावेळी तलाठी, मंडळ अधिकारी, कोतलवार, सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.

वीज पडून दोघे जखमी

कंधार - तालुक्यातील हळदा परिसरात बुधवारी सायंकाळी वीज पडून दोघे जखमी झाले. बालाजी फुलवळे यांच्या शेतात काम करणारे मजूर माधव शिंदे व पंडित कोंडामंगल जखमी झाले. त्यांना नांदेडच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आगग्रस्त कुटुंबीयांची भेट

हिमायतनगर - आ. माधवराव जवळगावकर यांनी वडगाव बु. येथील आगग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. यावेळी तहसीलदार गायकवाड, मकरंद भालेराव, परमेश्वर गोपतवाड, चांदराव पाटील, व्यंकटराव शिंदे, सज्जनराव मिरासे, रामू जाधव, गंगाधरराव जाधव आदी उपस्थित होते.

रेल्वे सुरू करा

किनवट - किनवट व माहूर तालुक्यासाठी आवश्यक रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड यांनी केली. यासंदर्भात त्यांनी रेल्वे अभावी येत असलेल्या अडीअडचणींचे उहापोह केला. रेल्वे सुरू न झाल्यास आंदोलन करण्याची तयारी त्यांनी निवेदनात दर्शविली आहे.

मुजीब शेख यांना निरोप

भोकर - येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती मुजीब शेख यांची अहमदनगर येथे बदली झाली. त्यांना पत्रकारांच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक पत्रकारांची उपस्थिती होती.

सावंत यांना पदाेन्नती

निवघा - येथील पोलीस चौकीतील पोलीस अंमलदार भारत सावंत यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली. याबद्दल त्यांचे अनेकांनी स्वागत केले.

लसीकरण करून घ्यावे

शेवडी बा.- सोनखेड प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत असलेल्या नागरिकांनी कोविड लसीकरण करून घ्यावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. अली यांनी केले. यावेळी डॉ. तृप्ती वटमे उपस्थित होते. ४५ वर्षांवरील स्त्री-पुरुषांनी लस घ्यायला हवी, लस घेतल्यानंतर कोणताही धोका नाही, लस सुरक्षित आहे असे वटमे यांनी सांगितले.

आयडिया टॉवरला आग

शेवडी बा.- सोनखेड येथील आयडिया कंपनीच्या टॉवरला १ जून रोजी दुपारी आग लागली. घटनेची माहिती मिळताच सोनखेड फिडर बंद करून वीज वितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. नांदेड येथून अग्निशमन दलाची गाडी केवळ ३० ते ३५ मिनिटात पोहचली. याकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, माजी उपसरपंच सुनील मोरे व अन्य नागरिक उपस्थित होते.

खत बियाणासाठी लगबग

हिमायतनगर - तालुक्यातील शेतकरी, खत, बियाणे खरेदी करण्यासाठी धावपळ करीत आहेत. शहरासह ग्रामीण भागातील काही कृषी दुकानदार पक्की पावती देत नसल्याची तक्रार आहे. काही दुकानदार खताच्या पोत्यामागे ५० रुपये जादा दर लावत आहेत. कृषी विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

महावितरणचे कार्यालय सुरू करा

कौठा - परिसरातील शिरूर, राऊतखेड, चौकी महाकाया गावचा पाणीपुरवठा विजेवर अवलंबून असल्याने विजेच्या लपंडावामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. कौठा ग्रामपंचायतने मासिक बैठकीत वीज वितरणाची कार्यालय सुरू करण्याचा ठराव मंजूर केल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी शिवाजी पानपट्टे यांनी दिली. कौठा येथे कार्यालय झाल्यास गावकऱ्यांना सोयीचे होणार आहे. तसेच पाणीटंचाई ही भासणार नाही.

मोठ्या पावसाची प्रतीक्षा

निवघा बाजार - हदगाव तालुक्यातील निवघा बाजार परिसरात मोठा पाऊस झाला नसल्याने पेरणीपूर्व मशागत व इतर कामे करण्यास अडचण येत असल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काडी कचरा वेचणीसाठी पाऊस पडला तर वेचणी सोपी होईल. मागील १५ दिवसांपासून या भागात ढगाळ वातावरण असल्याने उकाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. रोज ढग भरून येतात मात्र पाऊस पडत नसल्याचा अनुभव लोकांनी घेतला आहे.

अतिवृष्टी अनुदान वाटप

मांडवी - नांदेड जिल्हा बँकेच्या मांडवी शाखेने मांडवी गावातील सभासद शेतकरी वर्गाला दोन टप्प्यातील अतिवृष्टी अनुदान वाटप प्रक्रिया पूर्ण करून चांगला दिलासा दिला आहे. २२ गावांतील ७ हजार २४२ सभासद शेतकऱ्यांना जवळपास ८ कोटी ४७ हजार १४५ रुपये वाटप करण्यात आले. शेतकरी सन्मान निधीचे १,५०० लाभार्थी आहेत. काही महिला बचत गटांनाही पैसे ताबडतोब देण्याकामी प्रयत्नशील असल्याची माहिती शाखा व्यवस्थापक एस.आर. जाधव व रोखपाल जी.डी. सूर्यवंशी यांनी दिली. पेरणीपूर्व पैसा हाती आल्याने शेतकरी समाधान झाला आहे.

मशागतीच्या कामाला वेग

मारतळा - खरीप हंगामाच्या पूर्वसंध्येला सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्याने मशागतीच्या कामाला वेग आला. बळीराजा अलर्ट मोडवर आला आहे.

Web Title: Installation of Buddha statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.