विदर्भाच्या सीमेवर तपासणी छावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:27 IST2021-02-23T04:27:16+5:302021-02-23T04:27:16+5:30
नांदेड - सोळा तालुके व विस्तीर्ण क्षेत्रफळ असलेल्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कठोर उपाययोजना ...

विदर्भाच्या सीमेवर तपासणी छावणी
नांदेड - सोळा तालुके व विस्तीर्ण क्षेत्रफळ असलेल्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कठोर उपाययोजना हाती घेतल्या असून आता नांदेड जिल्ह्याच्या यवतमाळ सीमेवर तपासणी छावणी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वाढती बाधितांची संख्या लक्षात घेऊन नागरिकांना जिथल्या तिथे सुरक्षित राहता येईल व त्यांच्यावर आवश्यकतेनुसार वेळीच उपचार करणे सोईचे जाईल या उद्देशाने ही छावणी प्रवाशांच्या वाहतुकीवरील नियंत्रणासह लोकांना समुपदेशनाचेही काम करेल. पोलिसांच्या या छावणीत कोरोना चाचणी करता यावी यासाठी एक वैद्यकीय पथक राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ समवेत आता नागरिकांनी यापुढे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे मी जबाबदार ठरु नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन केले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही आज फेसबुक लाईव्ह द्वारे संवाद साधून नांदेड जिल्हावासीयांना काळजी घेण्यासमवेत प्रत्येकाने जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
प्रत्येक नागरिकांनी जर काळजी घेऊन अनावश्यक प्रवास व घराबाहेर पडण्याचे टाळले तर निश्चितच आपण सर्व मिळून कोरोनाच्या या प्रादुर्भावाला रोखू असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. त्याचवेळी कोरोना नियमांचा भंग करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.
0000