यशवंत महाविद्यालयात माहिती, तंत्रज्ञान उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST2021-06-05T04:14:01+5:302021-06-05T04:14:01+5:30
या स्पर्धेकरिता माहिती व तंत्रज्ञान, सायबर क्राइम आणि कोविड:१९ चा मानवी जीवनावरील परिणाम हे मुख्य विषय ठेवण्यात आले होते. ...

यशवंत महाविद्यालयात माहिती, तंत्रज्ञान उत्सव
या स्पर्धेकरिता माहिती व तंत्रज्ञान, सायबर क्राइम आणि कोविड:१९ चा मानवी जीवनावरील परिणाम हे मुख्य विषय ठेवण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेतील पारितोषिक विजेते स्पर्धक प्रथम क्रमांक- विनय रामदीनवार, बी.सी.एस. तृतीय वर्ष, द्वितीय क्रमांक- तनया पंगीलवार, एम.एस्सी. संगणकशास्त्र, प्रथम वर्ष, तृतीय क्रमांक- प्राची चिद्रावार, एम.एस्सी. संगणकशास्त्र, द्वितीय वर्ष, उत्तेजनार्थ पारितोषिक - श्रद्धा भेंडे, बी.सी.एस. द्वितीय वर्ष, शादमा उरुज, बी.एस्सी., द्वितीय वर्ष हे आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्याकरिता उपप्राचार्य डॉ. उत्तम सावंत, प्रा. डॉ. एल. व्ही. पद्माराणी राव, प्रा. डॉ. एम. एम. व्ही. बेग, प्रा. गौतम दुथडे, प्रा. डॉ. प्रवीण मिरकुटे, प्रा. डॉ. संजय नन्नवरे, प्रा. डॉ. एस. एस. बोडके, प्रा. डॉ. अजय गव्हाणे, संदीप पाटील आदींनी परिश्रम घेतले.