जिल्ह्यात आज दोन्ही गटांतील व्यक्तींना दुसरा डोसच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST2021-06-09T04:22:38+5:302021-06-09T04:22:38+5:30

९ जूनला मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या ११ केंद्रांवर लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा ...

Individuals from both groups will get a second dose in the district today | जिल्ह्यात आज दोन्ही गटांतील व्यक्तींना दुसरा डोसच मिळणार

जिल्ह्यात आज दोन्ही गटांतील व्यक्तींना दुसरा डोसच मिळणार

९ जूनला मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या ११ केंद्रांवर लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको या १० केंद्रावर कोविशिल्डचा ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या केंद्रांना प्रत्येकी १०० डोस उपलब्ध केले आहेत.

याव्यतिरिक्त कोव्हॅक्सिन ही लस दोन्ही गटांसाठी श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको अशा एकूण ११ केंद्रांवर प्रत्येकी १५० डोस याप्रमाणे उपलब्ध करून दिली आहेत. या ठिकाणी १८ ते ४४ व ४५ वर्षांवरील दुसऱ्या डोससाठी दिली जाईल.

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या १६ केंद्रांवर कोविशिल्डचे ही लस प्राधान्याने ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. येथे प्रत्येक केंद्रनिहाय १०० डोस उपलब्ध करून दिले आहेत.

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकूण १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी १०० डोस उपलब्ध करून दिले असून हे डोस १८ ते ४४ व ४५ वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठीच दिले जातील. जिल्ह्यातील सर्व ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशिल्ड ही लस उपलध करून देण्यात आली असून याठिकाणी ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व ६७ केंद्रांवर प्रत्येकी १०० याप्रमाणे डोस उपलब्ध करून दिले आहे.

१८ ते ४४ वर्षे वयोगटांतील लाभार्थींचे पहिल्या डोसचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. जिल्ह्यात ७ जूनपर्यंत एकूण ४ लाख ४५ हजार ९३२ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले तर ८ जूनपर्यंत कोविशिल्डचे ४ लाख २७ हजार ३३० डोस, कोव्हॅक्सिनचे १ लाख ४० हजार डोस याप्रमाणे एकूण ५ लाख ६७ हजार ३३० डोस प्राप्त झाले आहेत. कोविशिल्डचे डोस ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत तर कोव्हॅक्सिनचे डोस हे १८ ते ४४ वयोगट व ४५ वर्षांवरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहे. ऑनलाईन नोंदणीनंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Individuals from both groups will get a second dose in the district today