चार जिल्ह्यांसाठी स्वतंत्र वास्तूशास्त्रज्ञ कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST2021-06-02T04:15:42+5:302021-06-02T04:15:42+5:30
उपरोक्त चार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक इमारतींची कामे मंजूर आहेत. या कामांवर वास्तुविशारदीय दृष्टिकोनातून औरंगाबाद येथून कार्यान्वय करणे जिकिरीचे ...

चार जिल्ह्यांसाठी स्वतंत्र वास्तूशास्त्रज्ञ कार्यालय
उपरोक्त चार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक इमारतींची कामे मंजूर आहेत. या कामांवर वास्तुविशारदीय दृष्टिकोनातून औरंगाबाद येथून कार्यान्वय करणे जिकिरीचे आहे शिवाय किनवट, माहूर, हदगाव, भोकर यासारख्या दुर्गम आदिवासी तालुक्यातील अधिकाऱ्यांना औरंगाबाद येथे वास्तुविशारदीय कामांसाठी पाठपुरावा करणे अडचणीचे ठरते. सध्या नांदेड येथे इमारतींच्या कामांचा ओघ अधिक आहे. त्यामुळे औरंगाबाद वास्तुशास्त्रज्ञ कार्यालयाचे विभाजन करून नांदेडसाठी वास्तुशास्त्रज्ञाचे स्वतंत्र कार्यालय स्थापण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यासाठी मंजूर पदांपैकी एक वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, एक वास्तुशास्त्रज्ञ, एक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ व एक सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ ही चार पदे नांदेड कार्यालयाला देण्यात येणार आहेत. चार जिल्ह्यांसाठी नांदेडचे हे वास्तुशास्त्रज्ञ कार्यालय राहणार आहे. या कार्यालयाचे नियंत्रण औरंगाबाद येथून उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ कार्यालयाकडून केले जाणार आहे. नांदेडला नव्याने स्थापित या कार्यालयातील साधनसामग्रीच्या व्यवस्थेची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नांदेड येथील अधीक्षक अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. तांत्रिक पदाच्या वेतनाची मंजुरी औरंगाबाद कार्यालय येथे केली जाणार आहे.