शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खताच्या किमतीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:40 IST

खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला असला तरी पावसाचे आगमन अद्याप झाले नाही, त्यामुळे आभाळाकडे डोळे लागले आहेत़

ठळक मुद्देपावसाची प्रतीक्षा : दहा ते पंधरा टक्क्यांनी खते महाग

नांदेड : खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला असला तरी पावसाचे आगमन अद्याप झाले नाही, त्यामुळे आभाळाकडे डोळे लागले आहेत़ तर दुसरीकडे खताच्या किंमती वाढल्या आहेत़ निसर्ग व मानवनिर्मित संकटाचा सामना यंदाही शेतकऱ्यांना करावा लागणार आहे़दुष्काळाने खचलेल्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे़ शेतीची मशागत केल्यानंतर पेरणीसाठी सर्व तयारी करण्यात आली आहे़ मात्र यंदाही पावसाने हुलकावणी दिल्याने मृग नक्षत्र कोरडा जाण्याची भीती आहे़ आणखी एक आठवडाभर पावसाचे आगमन होणार नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे़ त्यामुळे यंदा पेरण्या लांबण्याची शक्यता आहे़ वेळेवर पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे़ निसर्गाचे संकट समोर असतानाच यंदा खताच्या किमतीतही वाढ झाली आहे़ त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ शासनाने रासायनिक खताचे दर जाहीर केले असून खताच्या किमतीत वाढ करून मागील वर्षीपेक्षा १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे़ त्यामुळे चांगल्या प्रतीचा खत घेणे शेतकºयांना अशक्य होणार आहे़ मागील वर्षी पोटॅश खताचा भाव ७०० रूपये होता़ यावर्षी ९५० रूपये भाव आहे़ २०:२०:१३ या खताचा भाव १ हजार १०० रूपये झाला असून यामध्ये १७० रूपये वाढ झाली आहे़ डीएपी खताचा भाव गतवर्षी १ हजार २०० रूपये होता़ यावर्षी १ हजार ४७५ रूपये भाव आहे़ १०:२६:२६ खत १ हजार ३५० भाव असून मागील वर्षीपेक्षा त्यात २१० रूपयांनी वाढ झाली आहे़ १५:१५:१५ खताचा भाव १ हजार ५० रूपये असून मागील वर्षीपेक्षा १०० रूपये वाढले आहेत़ तर १२:३२:१६ खताचा १हजार ३७५ रूपये भाव असून गतवर्षीपेक्षा २०० रूपयांनी भाव वाढला आहे़पुन्हा कर्जाचे दुष्टचक्ऱ़़शेतक-यांना खरीप हंगामात अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यास पुन्हा कर्जाचे दुष्टचक्र सुरू होणार आहे़ पिकातून मिळणारे उत्पन्न कमीच येणार असल्याने शेतकरी आतापासूनच चिंतातूर झाला आहे़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेती