शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

'आमदनी अठन्नी खर्चा रुपया'; कपाशीचा उत्पादन खर्च तीस हजार, उत्पन्न 16 हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 14:55 IST

कापसाची लागवड करण्यापासून खते, फवारणी, कोळपणी, वेचणी आदींंचा जवळपास एकरी ३० ते ३२ हजार रुपये खर्च जातो.

ठळक मुद्देचुकारेही वेळेत मिळेनातुटपुंज्या हमीभावाने शेतकरी हवालदिल 

नांदेड : जिल्ह्यात यंदा सोयाबीनपाठोपाठ कपाशीची लागवड झाली आहे. परंतु, कपाशीच्या उत्पन्नापेक्षा  काढण्यासाठी लागलेला खर्च अधिक होत आहे. यंदा अतिवृष्टीने कपाशीचे अतोनात नुकसान झाल्याने आमदनी अठन्नी खर्चा रुपया असे चित्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे. 

नांदेड जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. त्यापाठोपाठ कपाशीची ८० हजार हेक्टरवर लागवड झालेली आहे. कापसाची लागवड करण्यापासून खते, फवारणी, कोळपणी, वेचणी आदींंचा जवळपास एकरी ३० ते ३२ हजार रुपये खर्च जातो. तर प्रतिक्विंटल ५२०० रुपयेप्रमाणे यंदा भाव मिळालेला आहे. त्यात अतिवृष्टीने केवळ एकाच वेचणीत कपाशीची पऱ्हाटी होत आहे. एकरी २ ते ३ क्विंटलचा उतारा निघत आहे. त्यामुळे उत्पादनावर केलेला खर्चही निघणे कठीण बनल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

मजूरही मिळेनातयंदा अतिवृष्टीमुळे कापसाच्या बोंडामध्ये अळ्या पडल्याने कवडीचे प्रमाण वाढले आहे. हा कापूस वेचणीसाठी अवघड जातो. त्यामुळे रोजंदारीवर येणाऱ्या महिला मजुरांनी कापूस वेचणीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिकिलो अथवा ठोक दराने कापूस वेचणीस द्यावा लागत आहे.

खर्च सर्वाधिकखत आणि कीटकनाशकावर केला जाणारा खर्च सर्वाधिक असतो. यामध्ये विविध कंपन्यांच्या औषधींची खरेदी करण्यासाठी पाच ते दहा हजार मोजावे लागतात. यामध्ये दोन किंवा तीनच फवारण्या होतात.

यंदा सोयाबीन बियाणे बोगस निघाल्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर केलेल्या पेरणीतून खर्च काढण्यासाठी पिकांवर अतोनात मेहनत घेतली. परंतु, अतिवृष्टीने हाततोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यात शासनाकडूनही केवळ कोरडी आश्वासने दिली जात आहेत. परंतू अद्यापपर्यंत कुठलीही मदत मिळालेली नाही. शेतकर्यांना कोणीही वाली नाही. - सुदर्शन पाटील कल्याणकर,शेतकरी

कपाशीचे बिटी बियाणे घेण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात. लागवडीपासून ते वेचणीपर्यंत मुलाप्रमाणे पिकांचे पालनपोषण केले जाते. परंतु, ऐन वेचणीच्या काळात अतिवृष्टीने घात केला. तसेच शासनाकडूनही उत्पादनावर आधारित भाव मिळत नसल्याने तुटपुंज्या भावात पांढरे सोने व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे.  केलेला उत्पादन खर्चही निघत नाही. - शिवहरी गाढे, शेतकरी 

टॅग्स :cottonकापूसNandedनांदेडFarmerशेतकरी