अवघड क्षेत्रातील गावामध्ये ४८ शाळांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:22 IST2021-04-30T04:22:28+5:302021-04-30T04:22:28+5:30
नव्याने अवघड क्षेत्र म्हणून मान्यता मिळालेल्या ४८ शाळांमध्ये मुखेड तालुक्यातील जि. प. प्र. शाळा वळंकी, हदगाव तालुक्यातील जि. प. ...

अवघड क्षेत्रातील गावामध्ये ४८ शाळांचा समावेश
नव्याने अवघड क्षेत्र म्हणून मान्यता मिळालेल्या ४८ शाळांमध्ये मुखेड तालुक्यातील जि. प. प्र. शाळा वळंकी, हदगाव तालुक्यातील जि. प. प्रशाला पोत्रेवाडी, जि. प. प्रशाला केशरनाईक तांडा तर माहूर तालुक्यातील प्राथमिक शाळा अजनी, धानोरा (दि), चोरड, दिगडी (कु), हिगणी, तांदळा, तांदळा तांडा, भीमपूर, दहेगाव, हनुमाननगर, पवनाळा वरचा, पवनाळा खालचा आणि प्राथमिक शाळा शिऊर या शाळांचा समावेश आहे. तर किनवट तालुक्यातील प्राथमिक शाळा दत्तनगर, पांगरपहाड, बोरबन तांडा, मोहाडा, पिंपळशेडा, डोंगरगाव (नि), कोलमपेठ, धामनदरी, प्रेमनगर, वसंतवाडी, जगदंबा तांडा, सिडामखेडा, वरगुडा, मांजरी माथा, भुजंगनगर, वागदरी, उमरवाडी, भीमपूर, पितांबरवाडी, पोतरेड्डी तांडा, रामपूरवाडी, कोलामगुडा, टेंभी मजरा, भंडारवाडी, पिंपरी, चंद्रपूरपाटी, घोगरवाडी, शिवशक्तीनगर, पितांबरवाडी, लक्कडकोट आणि जि. प. प्राथमिक शाळा, सेवादास तांडा या शाळांचा समावेश करण्यात आला आहे.
चौकट--------------
बदली प्रक्रियेकडे शिक्षकांचे लक्ष
शासनाच्या नव्या निकषानुसार यंदा जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया करण्यात येणार आहे. यंदा या प्रक्रियेसाठी शासनाने अनेक नियम घालून दिले आहेत. त्यामध्ये अवघड क्षेत्रातील गावांची निवड करणे महत्त्वाचा टप्पा होता. अवघड क्षेत्रातील शाळांवरील शिक्षकांची रिक्त पदे प्राधान्याने भरण्याची तरतूद आहे. मात्र आता या अवघड क्षेत्रामध्ये जिल्ह्यातील केवळ ४८ शाळाच पात्र ठरल्याने उर्वरित सर्व शाळा या सर्वसाधारण क्षेत्रात अंतर्भूत झाल्या आहेत.