शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; नांदेड-हिंगोली जिल्ह्यात यंदाची दिवाळी 'काळी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 19:02 IST

शासनाने ७ मार्च २०२४ रोजी शक्तिपीठ महामार्गाची अधिसूचना प्रसिद्ध केली होती, परंतु तेव्हापासूनच बाराही जिल्ह्यांमध्ये या महामार्गाला प्रखर विरोध होत आहे.

मालेगांव ( जि.नांदेड) : शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित झालेल्या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या कथित अन्यायकारक धोरणाचा निषेध म्हणून यंदाची दिवाळी 'काळी दिवाळी' म्हणून साजरी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. काल (दि. १९ ऑक्टोबर) अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महामार्गाला प्रखर विरोधशासनाने ७ मार्च २०२४ रोजी शक्तिपीठ महामार्गाची अधिसूचना प्रसिद्ध केली होती, परंतु तेव्हापासूनच बाराही जिल्ह्यांमध्ये या महामार्गाला प्रखर विरोध होत आहे. शेतकऱ्यांची मागणी नसलेला हा महामार्ग बहुतांश बागायती पट्ट्यातून जात असल्याने, तुरळक ठिकाणे वगळता इतरत्र जमीन संपादनाच्या कामाला शेतकऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बाधित शेतकऱ्यांनी संयुक्त मोजणीचा कार्यक्रम सर्वत्र उधळून लावत महामार्ग विरोधात तीव्र उद्रेक व्यक्त केला. यामुळे शासनाला या महामार्गाच्या अधिसूचनेचा कालावधी २८ एप्रिल २०२६ पर्यंत वाढवावा लागला आहे.

दिवाळी साजरी करण्याचा त्राण नाहीअतिवृष्टीचा मोठा फटका, सोयाबीनचे अत्यल्प उत्पादन, सोयाबीनच्या दरातील लक्षणीय घट आणि शासनाकडून जाहीर केलेली मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास येत असलेल्या अडचणींमुळे शेतकऱ्यांमध्ये दिवाळी सण साजरा करण्याचा त्राण उरलेला नाही. अशातच, शक्तिपीठ महामार्ग मोजणीची टांगती तलवार शेतकऱ्यांची झोप उडविणारी ठरली आहे. त्यामुळे आनंद हिरावून घेणारी ही दिवाळी 'काळी दिवाळी' म्हणून साजरी करण्याचा निर्धार शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी या बैठकीत व्यक्त केला.

या बैठकीस नागोराव इंगोले मालेगावकर, प्रमोद इंगोले, सुभाष मोरलवार, गजानन तीमेवार, सतीश कुलकर्णी, मारुती सोमवारे, जळबा बुट्टे, गोविंद कामेवार, अंबादास इंगोले, प्रदीप पाटील, शंकर तीमेवार, दशरथ स्वामी, कचरू मुधळ (उमरी), प्रदीप अडकिने (डोंगरकडा), दिलीप कराळे, धोंडबाराव कल्याणकर (गिरगाव), अनिल चव्हाण, ज्ञानोबा हाके (भाटेगाव), सुभाष इंगळे (हदगाव) यांच्यासह मोठ्या संख्येने बाधित शेतकरी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Shaktipith highway-affected farmers declare 'Black Diwali' in Nanded-Hingoli protesting unfair policies.

Web Summary : Farmers in Nanded and Hingoli, affected by the Shaktipith highway project, will observe a 'Black Diwali' to protest against perceived unjust government policies. They face crop losses, low prices, and delayed aid, compounded by highway land acquisition concerns.
टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्ग