शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; मनसेची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 19:25 IST

योजनांची प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली

नांदेड : जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने ज्या योजना जाहिर केल्या आहेत त्या योजनांची प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागिरदार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

सतत तीन वर्षापासून जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले आहे. परिणामी खरीप आणि रब्बी हंगाम उध्वस्त झाले. शेती व्यवसाय जवळ-जवळ मोडीत निघण्याच्या परिस्थितीत आहे. शेतकरी, शेतमजूर हवालदिल झाला आहे. यामुळे शासन नियमाप्रमाणे दुष्काळग्रस्त भागात जमिन महसूलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या विज बिलात साडे तेहतीस टक्के सूट, शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजने अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या शेतकर्‍यांच्या शेतीच्या पंपाची विज जोडणी खंडीत न करणे अशा योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. 

नांदेड जिल्ह्यात या योजनेपैकी एकाही योजनेला योग्य तो न्याय मिळाला नाही. परिणामी शेतकरी आणि सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. शेतकर्‍यांना जगण्याचा आधार मिळावा यासाठी शासनाकडून शेड नेट हाऊस, मिनी ऑईल मिल, पावर टिलर, शेळी पालन, पॉली हाऊस, कुकुटपालन, दाल मिल, ट्रॅक्टर व अवजारे अशी साधनसामुग्री उपलब्ध करून देण्याचेही निर्देश आहेत. 

या सर्व योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागिरदार, शहर अध्यक्ष शफीक अब्दुल, जिल्हाध्यक्ष रवि राठोड, मनविसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील दरडे, जिल्हा उपाध्यक्ष गजानन चव्हाण, संतोष सुनेवाड यांच्यासह अनेकांनी केली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळNandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडMNSमनसे