सातव यांच्या निधनाने काँग्रेस परिवाराची अपरिमित हानी - आ. मोहनराव हंबर्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:15 IST2021-05-17T04:15:51+5:302021-05-17T04:15:51+5:30

असा नेता होणे नाही - खासदार हेमंत पाटील नांदेड : हिंगोली जिल्ह्याचे नाव अत्यंत कमी वयात राष्ट्रीय पातळीवर नेऊन ...

The immense loss of the Congress family due to the demise of Satav - Aa. Mohanrao Humberde | सातव यांच्या निधनाने काँग्रेस परिवाराची अपरिमित हानी - आ. मोहनराव हंबर्डे

सातव यांच्या निधनाने काँग्रेस परिवाराची अपरिमित हानी - आ. मोहनराव हंबर्डे

असा नेता होणे नाही - खासदार हेमंत पाटील

नांदेड : हिंगोली जिल्ह्याचे नाव अत्यंत कमी वयात राष्ट्रीय पातळीवर नेऊन उंचवणारे तरुण तडफदार नेतृत्व राज्यसभेचे खासदार ॲड. राजीवजी सातव यांच्या निधनामुळे हिंगोली जिल्हा आणि महाराष्ट्राचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे. वास्तविक पाहता हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते. त्यांच्या जाण्यामुळे देशातील, राज्यातील युवकांची आशा उंचावणारा नेता राज्याला गमवावा लागला ही खूपच दुःखद घटना आहे. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषवून जनतेची सेवा केली. त्यांचे जाणे मनाला चटका लावून गेले. जनसामान्यांच्या मनात त्यांनी निर्माण केलेले स्थान सदैव अढळ राहील, अशा शब्दात हेमंत पाटील यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Web Title: The immense loss of the Congress family due to the demise of Satav - Aa. Mohanrao Humberde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.