कोरोनाग्रस्त रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन तत्काळ उपलब्ध करून द्या- हरिहरराव भोसीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:18 IST2021-04-27T04:18:33+5:302021-04-27T04:18:33+5:30
कोरोनाग्रस्त रुग्ण हे नांदेडच्या शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या उपचार घेणाऱ्या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन बाजारात ...

कोरोनाग्रस्त रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन तत्काळ उपलब्ध करून द्या- हरिहरराव भोसीकर
कोरोनाग्रस्त रुग्ण हे नांदेडच्या शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या उपचार घेणाऱ्या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन बाजारात उपलब्ध होत नाही. ऑक्सिजनचा तुटवडा ही आहे. त्यामुळे रुग्णांची प्रकृती चिंताजनक होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यामध्ये लक्ष घालत रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावे.
अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र लस उपलब्ध नसल्यामुळे बंद आहेत. विशेषतः श्री गुरू गोविंदसिंह रुग्णालयातही लस उपलब्ध नाही. लसीकरण केंद्र लस मागवून घेऊन चालू करावे, अशीही मागणी निवेदनात केली आहे.
काही लसीकरण केंद्रावर लस देणे व कोरोना चाचणी करणे हे एकाच ठिकाणी होत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढू शकतो, त्यामुळे लसीकरण व कोरोना चाचणी हे वेगवेगळ्या ठिकाणी करावेत, जेणेकरून संसर्गाचा धोका कमी होईल, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डी.बी. जांभरूनकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब भोसीकर, नागनाथराव खेळगे आदी उपस्थित होते.