अवैध दारू विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:15 IST2020-12-25T04:15:00+5:302020-12-25T04:15:00+5:30

अखंड हरिनाम सप्ताह हिमायतनगर - सिबदरा येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. आठ दिवस विविध कार्यक्रम ...

Illegal sale of alcohol | अवैध दारू विक्री

अवैध दारू विक्री

अखंड हरिनाम सप्ताह

हिमायतनगर - सिबदरा येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. आठ दिवस विविध कार्यक्रम होतील. २२ डिसेंबर राेजी सप्ताहाची सुरुवात झाली. सांगता २९ रोजी होणार आहे. यानिमित्ताने काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, हरिकीर्तन आदी कार्यक्रम होतील.

पुरस्कार प्रदान सोहळा

अर्धापूर - येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने भूगोल विषयात तिन्ही वर्षांत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास भूगोल भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाच्या शैक्षणिक वर्षाचा पुरस्कार शुभांगी डखणे यांना मिळाला. या पुरस्काराचे विरतण शारदा भवन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर यांच्या हस्ते करण्यात आले. रोख एक हजार रुपये व गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

गाडगेबाबा पुण्यतिथी

नायगाव बाजार - धोबी परीट सेवा मंडळाच्या वतीने नायगाव व नरसी येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे, बाळासाहेब पांडे, गंगाधर मावले, गोविंद नरसीकर, गंगाधर गंगासागरे, राजू बागडे, बाळू इकळीकर, चंद्रकांत सोनखेडकर, शंकर वडपत्रे, संभाजी खडके, माधव शिकारे, दिलीप लोंढे, शैलेष इबितवार आदी उपस्थित होते.

Web Title: Illegal sale of alcohol