शैक्षणिक संस्थांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष, एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:15 IST2021-05-29T04:15:04+5:302021-05-29T04:15:04+5:30
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालकांना ...

शैक्षणिक संस्थांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष, एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा उपक्रम
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणे जिकरीचे झाले आहे. शैक्षणिक संस्था मात्र कोणत्याही प्रकारची तडजोड करायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही शैक्षणिक संस्था आपल्या शुल्कामध्ये एक रुपयाही कमी करण्यास तयार नाहीत. ज्या सुविधा गेल्या वर्षभरात वापरला नाहीत, त्या सुविधांचेही शुल्क मागील वर्षी शिक्षण संस्थांनी वसूल केले. संकटाच्या काळामध्ये शिक्षणासारख्या पवित्र व्यवसायामध्ये शैक्षणिक संस्था नफा सोडायला तयार नाहीत. नर्सरी ते दहावीचे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांनी शैक्षणिक साहित्य (पुस्तके, वह्या इ.) शाळेतूनच घ्यावी लागतील, ही सक्ती करू नये. तसेच बोर्डाने जी पुस्तके निर्देशित केली आहेत तीच पुस्तके शिकवताना वापरावीत. दुसऱ्या कोणत्याही प्रकाशनाची महाग पुस्तके पालकांना घेण्यास भाग पाडू नये. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्या शिक्षण संस्थेची तक्रार संबंधित बोर्डाकडे करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम, फैसल सिद्दिकी, मोहम्मद दानिश, रोहित पवार, सतविंदर सिंग, योगेश किरकन, मोहम्मद सोहेल, मोहम्मद आदिल, साईप्रसाद पाटील, गोविंद भारती इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.