शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला जागा देण्यासाठी पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:17 AM

नांदेड रेल्वेस्थानकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आहे. मात्र अभिवादनासाठी या ठिकाणी जागा अपुरी पडत असल्याने शेजारील विक्रीकर कार्यालय इतरत्र हलवून डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कार्यालयाची जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीसह सम्यक आंदोलनच्या शिष्टमंडळाने गुरुवारी खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली.

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण यांचा शब्द स्मारक समितीसह सम्यकच्या शिष्टमंडळाची भेट

नांदेड : नांदेड रेल्वेस्थानकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आहे. मात्र अभिवादनासाठी या ठिकाणी जागा अपुरी पडत असल्याने शेजारील विक्रीकर कार्यालय इतरत्र हलवून डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कार्यालयाची जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीसह सम्यक आंदोलनच्या शिष्टमंडळाने गुरुवारी खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित जागेसाठी पाठपुरावा करण्याची तसेच आगामी काळात काँग्रेसची सत्ता आल्यास सदर जागा स्मारकासाठी देण्याचा शब्द खा. चव्हाण यांनी शिष्टमंडळाला दिला.रेल्वेस्थानकासमोर महानगरपालिकेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. मात्र पुतळा परिसरातील जागा अपुरी पडत आहे. विशेषत: अभिवादनासाठी अनुयायांनी गर्दी केल्यानंतर त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळेच स्मारक समितीचे अध्यक्ष रमेश सरोदे यांच्या नेतृत्वाखाली रमेश सोनाळे, एन. डी. गवळे, कोंडदेव हटकर, अ‍ॅड. जयप्रकाश गायकवाड, राजेश गोडबोले यांच्यासह सम्यक आंदोलनचे अध्यक्ष प्रफुल्ल सावंत आणि सत्यशोधक विचारमंचचे कोंडदेव हाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चव्हाण यांना निवेदन देवून पुतळ्याशेजारील विक्रीकर कार्यालयाची इमारत स्मारकासाठी देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री असताना या मागणीला आपण स्वीकृती दिली होती ही बाबही या पदाधिकाऱ्यांनी चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली.यावर तेथील परिस्थिती पाहता आपली मागणी रास्त असल्याचे सांगत सदर जागा स्मारकासाठी मिळावी म्हणून पाठपुरावा करील. याबरोबरच येणा-या काळात राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास याबाबतचा निर्णय तातडीने घेऊन स्मारकासाठी जागा देवू, असा शब्द खा. चव्हाण यांनी शिष्टमंडळाला दिला. यावेळी समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर