शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

‘खिडक्या’तून उलगडले मानवी स्वभावाचे कंगोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:21 AM

यावरच आधारित ‘खिडक्या’ या नाट्यकृतीतून मानवी स्वभावाचे कंगोरे दाखविण्यात परभणीच्या राजीव गांधी युवा फोरमला यश आले.

ठळक मुद्देहौशी राज्य नाट्यस्पर्धा परभणीच्या राजीव गांधी युवा फोरमने गाजविला दिवस

नांदेड : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक खिडकी बंद असते. ही खिडकी उघडल्यास आपली बदनामी होईल, आपले खरे स्वरूप जगासमोर येईल, अशी भीती त्याला वाटत असते. त्यामुळेच ही खिडकी कायमची बंद ठेवण्याकडे त्याचा कल असतो. यावरच आधारित ‘खिडक्या’ या नाट्यकृतीतून मानवी स्वभावाचे कंगोरे दाखविण्यात परभणीच्या राजीव गांधी युवा फोरमला यश आले.येथील कुसुम सभागृहात महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू आहे. स्पर्धेच्या नवव्या दिवशी परभणी येथील राजीव गांधी युवा फोरमने संजय पांडे निर्मित ‘खिडक्या’ हे नाटक सादर केले. सर्वार्थाने कलावंतांसाठी आव्हानात्मक असलेल्या या नाटकातून अपेक्षित संदेश अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात हे नाटक यशस्वी ठरले.नाटकातील सुप्रसिद्ध लेखक विश्राम सूत्रावे (गिरीष कराडे) यांचा मृत्यू होतो आणि नाटकाला सुरुवात होते. त्यांच्या वेगवेगळ्या शोकसभांतून लोकांना समजलेले महान लेखक म्हणून सूत्रावे दिसतात. मात्र सूत्रावे यांचा मुलगा गुणी (सौरभ कुरुंदकर) हा वडिलांच्या आयुष्यातील एक-एक खिडकी उघडत जातो. विशेष म्हणजे, सूत्रावे यांचा मुलगा नसतो तर लहानपणी आईवर झालेल्या अत्याचारातून आपण जन्मल्याचे तो उघड करतो. आई शारदा (डॉ. अर्चना चिक्षे) ही विश्राम सूत्रावेंची बायको नाही तर बहीण आहे. फक्त अत्याचारातून जन्माला आल्याने मुलाला वडील मिळाले.आपल्या बहिणीसोबत नात्यात पवित्रता ठेवून जगासमोर ते पती-पत्नीचे नाते दाखवित होते. त्यांच्या या महान त्यागामुळे मनात वडिलांविषयी आदरच निर्माण होतो. मात्र याचवेळी त्याची आई सूत्रावे यांच्या आयुष्यातील आणखी एक खिडकी उघडते. सूत्रावे हे नपुंसक होते, हे त्यांची विद्यार्थिनी गीता साने (सुनंदा दिगोळकर) यांच्याकडून कळते. स्वत:चे नपुंसकत्व लपविण्यासाठी बहिणीला उपकाराच्या ओझ्याखाली ठेवून आयुष्यभर पिळवणूक करणारा विश्राम सूत्रावे समाजाच्या नजरेत एक प्रतिष्ठित साहित्यिक असतो. अशा प्रकारे मानवी स्वभावाचे कंगोरे हे नाटक उलगडत जाते. नाटकातील गिरीष कराडे, डॉ. अर्चना चिक्षे यांनी साकारलेल्या भूमिका लक्ष्यवेधी आहेत तर सौरभ कुरुंदकर, अमित देशपांडे, डॉ. धिरज देशपांडे, सचिन संघई, सुनंदा दिघोळकर, सिद्धार्थ मस्के, तानया लोकरे, आदित्य पांडे, श्रीकांत कुलकर्णी यांनीही आप-आपली भूमिका उत्तम साकारली आहे. नैपथ्य रेवती पांडे आणि सरोज पांडे तर साक्षी घोडेकर यांची प्रकाशयोजना आहे.अनुपमा झिंगरे, शोभा पुराणिक यांनी संगीताची तर दिनकर जोशी, अनिल पांडे, अजय डिघोळकर, संतोष चिक्षे यांनी रंगमंचाची व्यवस्था सांभाळली.२७ नोव्हेंबर रोजी बीडच्या नटरंग कलामंदिरातर्फे चंद्रशेखर मुळे लिखित आणि लक्ष्मीकांत दोडके दिग्दर्शित ‘अल्बम’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :NandedनांदेडTheatreनाटक