मानवविकासच्या बसेसला हिमायतनगरचा विसर
By Admin | Updated: June 23, 2014 00:03 IST2014-06-22T23:50:52+5:302014-06-23T00:03:54+5:30
हिमायतनगर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी मानवविकासच्या बसेस महत्त्वाच्या ठरतात़ मात्र शाळा सुरु होवून आठवडा लोटला तरी अद्याप ही बससेवा सुरु झालेली नाही़
मानवविकासच्या बसेसला हिमायतनगरचा विसर
हिमायतनगर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी मानवविकासच्या बसेस महत्त्वाच्या ठरतात़ मात्र शाळा सुरु होवून आठवडा लोटला तरी अद्याप ही बससेवा सुरु झालेली नाही़
दूर्गम भागाचा सर्वांगीन विकास व्हावा, येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी मानव विकास मिशनअंतर्गत विविध योजना राबविण्यात येतात़ जेथे माध्यमिक शाळा नाहीत अशा गावातील विद्यार्थ्यांना तालुक्यावरील शाळांपर्यंत ने आण करण्यासाठी मानव विकास अंतर्गत बससेवा सुरु करण्यात आली़ मुलींसाठी ही सेवा मोफत तर मुलांसाठी माफक शुल्क आकारले जाते़ हिमायतनगर तालुक्यात मागील वर्षी पाच बसेस मानव विकास योजनेसाठी एसटी महामंडळास दिल्या होत्या़ तालुक्यातील पळसपूर, डोलारी, सिरपल्ली, बोरगडी, धानोरा, टाकळी, सिरंजनी, एकंबा, कोठा, कामारी जवळगाव, हिमायतनगर, सवना, जिरोणा, महादापूर, टेंभी, आंदेगाव, पवना, दरेसरसम, पोटा, सोनारी, करंजी, सरसम, मंगरुळ, खैरगाव, शिपदरा, कार्ला, वडगाव या गावांतील विद्यार्थी या बसेसचा लाभ घेतात़ पाच मार्गावर मानव विकासच्या बसेस गत वर्षी धावल्या़ अन्य काही गावे अद्यापही या सेवेपासून वंचित आहेत़ यंदा तर पूर्वीच्या मार्गावरही मानव विकासची बस अद्यापि धावलीच नाही़
याबाबत हदगाव आगार प्रमुख मुपडे यांच्याशी संपर्क केला असता कामारी-जवळगाव व शिरपल्ली-कोठा या मार्गावर बस सुरु करण्यात आली़ अन्य मार्गावरही बसेस सुरु करण्यात येतील असे त्यांनी सांगीतले़
ही बससेवा पूर्ववत सुरु करुन शाळेच्या वेळापत्रकानुसार बसेसच्या फेऱ्यांचे नियोजन करावे, अशी मागणी पालकांतून होत आहे़ (वार्ताहर)
दीड हजार विद्यार्थ्यांचा राबता
हिमायतनगर येथे चार हायस्कूल, दोन ज्युनिअर व एक सिनिअर कॉलेज आहेत़ तालुक्यातील दीड हजारावर विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी दररोज येथे येतात़ माध्यमिक शाळांचे विद्यार्थी मानव विकासच्या बसेसचा लाभ घेतात़ ग्रामीण भागातील पालक बहूतांश शेतकरी, मजूर आहेत़ त्यांची आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने पाल्यांच्या शिक्षणासाठी प्रवासखर्च करणे शक्य नाही़