शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘वीज वितरण’ मध्ये संतप्तांचा प्रचंड गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:27 IST

चोवीस तासांत वीजपुरवठा नाही केल्यास शेतात आत्महत्या करु, असा पवित्रा शेतक-यांनी घेतला.

धर्माबाद : पाण्याअभावी पिके करपून जात असल्याने वीजबिल भरूनही, वीजपुरवठा करण्यास टाळाटाळ झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी २७ नोव्हेंबर रोजी धर्माबाद कार्यालयात गोंधळ घालून सहाय्यक अभियंता पांडे यांना धारेवर धरले. चोवीस तासांत वीजपुरवठा नाही केल्यास शेतात आत्महत्या करु, असा पवित्रा शेतक-यांनी घेतला.रत्नाळी शिवारातील एक-दीड महिन्यांपूर्वी डीपी जळाल्याने शेतातील वीजपुरवठा खंडित झाल्याने ऐन भिजवणी पिकांना पाणी देणे बंद पडले. हाताला आलेली पिके पाण्याअभावी करपून जात होती. तब्बल दीड महिन्यांपूर्वीच डीपी जळाल्याचे संबंधित विभागाला लेखी, तोंडी सांगितले. वीजबिल भरले, तरीही वीज वितरण डीपी बसविण्यात दीड-दीड महिना वेळ लागत असल्याने संतापून शेतक-यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन सहाय्यक अभियंता पांडे यांना धारेवर धरले. यावेळी शेतकरी मारोती पाटील जाधव, नरेश रेडी आरकलवार, कांतराव रत्नाळीकर, बाबूराव जाधव, मारोती मदनूरकर, नरेश मुनलोड, सुरेश माळी, लक्ष्मण ईप्तेकर, गंगाधर लालू आदी शेतकरी उपस्थित होते.

.. तर शेतात आत्महत्या करु, शेतक-यांचा पवित्रा

  • चोवीस तासांत वीजपुरवठा नाही केल्यास शेतात आत्महत्या करू असा पवित्रा शेतक-यांनी घेतला.
  • हाताला आलेली पिके पाण्याअभावी करपून जात असल्याने शेतक-यांत संताप
  • शेतक-यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन वीज वितरण सहाय्यक अभियंता पांडे यांना धारेवर धरले.                                                                                      

यासंदर्भात देगलूर येथील मुख्य कार्यकारी अभियंता गोपुलवार यांच्याशी संपर्क केला असता उद्या दोन डीपी पाठवून देतो, असे आश्वासन त्यांनी दिल्याने शेतकरी शांत झाले. अन्यथा जोपर्यंत डीपी बसविणार नाही तोपर्यंत या कार्यालयातून हटणार नाही, असा पवित्रा शेतक-यांनी घेतला होता. याशिवाय अनेक भागांत डीपी जळालेली उदाहरणे असून पाण्याअभावी पिके करपून जात असल्याने अनेक शेतकºयांच्या तक्रारी वाढत आहेत. दरम्यान, धर्माबाद तालुक्यातील विजेची अवस्था बिकट झाली आहे. चुकीची बिले देणे, रिडींग न घेता अंदाजीत बीले अदा करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. काही पथदिवे नुसतेच उभे असल्याने ते शोभेची वास्तू ठरले आहेत. नांदेडच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.बिल भरुनही वीज देण्यास टाळाटाळ

  • तालुक्यात सोळा डीपी जळालेले आहेत़ डीपीची मागणी केली तर अ‍ॅडजस्टमेन्ट करा म्हणून वरिष्ठ अधिकारी ताकीद देतात. अन्यथा वरिष्ठ अधिकारी मला निलंबित करण्याची धमकी देतात, असे दोन वेळेस निलंबित झालो आहे. मी कोणाचे ऐकू, इकडे शेतकरी, नागरिक दररोज येऊन त्रास देतात. मला नोकरी टिकवायची आहे. वरिष्ठानी डीपी दिले तर डीपी पाठवेन, पण स्वखर्चाने वाहने भाडे करून डीपी भोकरवरून आणावे लागेल असे सदरील शेतक-यांना सहाय्यक अभियंता पांडे यांनी सांगितले.
  • दीड महिना झाले तरीही जळालेली डीपी बसवित नाहीत़ लेखी पत्र, तोंडी सांगितले तरीही उडवाउडवीचे उत्तर देतात. मग पिकाला पाणी कसे द्यावे, याचे वीजबिलही भरलो आहोत, तरीही निष्क्रिय महावितरण लक्ष देत नाही असे मत शेतकरी नरेश रेडी आरकलवार, मारोती पाटील जाधव यांनी मांडले़
टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीelectricityवीज