शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

HSC Result 2024: नांदेड जिल्ह्याचा ९१.११ टक्के निकाल, यंदाही मुलींनी मारली बाजी

By प्रसाद आर्वीकर | Updated: May 21, 2024 15:57 IST

लातूर विभागात नांदेड जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे.

नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला असून, जिल्ह्याचा निकाल ९१.११ टक्के लागला आहे. लातूर विभागात नांदेड जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये बारावी परीक्षा घेतल्या होत्या. या परीक्षांमध्ये नांदेड जिल्ह्यातून ४० हजार ७५९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ४० हजार  १८३ विद्यार्थी परीक्षेला पात्र ठरले.  ३६ हजार ६१३  विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.११ टक्के एवढे आहे. लातूर विभागात लातूर जिल्ह्याचा सर्वाधिक ९४.३० टक्के निकाल लागला आहे. त्या खालोखाल धाराशिव जिल्ह्याचा ९१.१७ टक्के आणि नांदेड जिल्ह्याचा ९१.११ टक्के निकाल लागला आहे. 

निकालात मुलींनी मारली  बाजी बारावी परीक्षेच्या निकालामध्ये मुलींनी यावेळीही बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.४५ टक्के एवढे आहे. तर  मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.३० टक्के आहे. जिल्ह्यातून १८ हजार ५९४ मुलींनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १८ हजार ३६७ मुलींनी परीक्षा दिली. १७ हजार ३४८ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.४५ टक्के आहे.

अर्धापूर तालुक्याचा सर्वाधिक निकाल नियमित विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये अर्धापूर तालुक्याने बाजी मारली आहे. या तालुक्याचा ९७.७१ टक्के असा जिल्ह्यात सर्वाधिक निकाल लागला आहे. त्या खालोखाल नायगाव तालुक्याचा ९६.६२ टक्के , मुखेड तालुक्याचा ९६.३४ टक्के, लोहा ९५.९१, कंधार ९४.७७, बिलोली ९२.८४, किनवट ९२.९५, मुदखेड ९२.४८, उमरी ९२.३६, भोकर ९०.४७, देगलुर ८९.६६, नांदेड ८६.६१, धर्माबाद ८४.६०,  हिमायत नगर ८०.७३ आणि हदगाव तालुक्याचा ७७.७५ टक्के निकाल लागला आहे.

विज्ञान शाखेचा ९७.४५ टक्के निकालनांदेड जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९७.४५ टक्के लागला आहे. कला शाखेचा ८१.६० टक्के, वाणिज्य शाखेचा ९०.७८ टक्के, व्होकेशनल  ८३.८३ टक्के तर टेक्निकल सायन्स शाखेचा निकाल ७५.८२ टक्के लागला आहे.

टॅग्स :NandedनांदेडHSC / 12th Exam12वी परीक्षा