शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

घरासमोर खड्ड्यात पुरले चोरीचे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:56 IST

या महिलेने चोरीचे हे सोने घरासमोरच खड्डा करुन पुरुन ठेवले होते़ पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिच्याकडून चोरीतील सर्व सोने जप्त केले आहे़

ठळक मुद्देदुकानातील महिलेला पकडले २३ लाख ८५ हजारांचे सोने केले जप्त

नांदेड : शहरातील गोविंदराज ज्वेलर्समधून दुकानात काम करणाऱ्या एका महिलेने २३ लाख रुपये किमतीचे सोने लंपास केले़ ही घटना २६ डिसेंबरच्या सायंकाळी घडली होती़ या महिलेने चोरीचे हे सोने घरासमोरच खड्डा करुन पुरुन ठेवले होते़ पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिच्याकडून चोरीतील सर्व सोने जप्त केले आहे़वंदना विठ्ठलराव तांदळे (वय ३९, रा़चिखलवाडी ता़भोकर) असे महिलेचे नाव आहे़ गेल्या दीड वर्षांपासून ही महिला गोविंदराज ज्वेलर्स येथे कामाला होती़ या ठिकाणी दुकानातील प्रत्येकाकडे एक काऊंटर देण्यात आले आहे़ येणाºया ग्राहकांना काऊंटरमध्ये असलेल्या डब्यातील सोने काढून दाखविण्याचे काम वंदना तांदळे यांच्याकडे होते़ २६ डिसेंबर रोजी वंदना तांदळे हिने आपल्याजवळील पर्स सोन्याच्या डब्याजवळ ठेवली होती़ सायंकाळी आपले काम आटोपल्यानंतर कॅरिबॅगमध्ये पर्ससह २३ लाख ८५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा डबा टाकून ती दुकानाबाहेर पडली़ हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता़सायंकाळी दिवसभराच्या व्यवहाराची तपासणी केल्यानंतर काऊंटरमधील दागिन्यांचा एक डबा गायब असल्याचे दुकानमालक निलेश तापडीया यांच्या लक्षात आले़ त्यांनी लगेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, वंदना तांदळे यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या़ त्यांनी लगेच याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ त्यानंतर पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ़ अक्षय शिंदे, उपअधीक्षक अभिजित फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि़ संदीप शिवले, पोउपनि किरण पठारे, अमोल कडू, नमिता देशमुख, पोहेकॉ़ शेख गौस शेख नबी, नागिनी मुंढे यांनी २४ तासांच्या आत आरोपी वंदना तांदळे यांच्या मुसक्या आवळल्या़ उडवाउडवीची उत्तरे देणाºया तांदळे यांची कसून तपासणी केल्यानंतर त्यांनी घरासमोरील खड्ड्यात पुरुन ठेवलेले २३ लाख रुपये किमतीचे सोने पोलिसांच्या हवाली केले़ या प्रकरणी वंदना तांदळे हिच्याविरोधात वजिराबाद ठाण्यात गुन्हा नोंद झाला़सीसीटीव्हीमुळे लागला आरोपीचा शोधगोविंदराज ज्वेलर्सच्या तापडिया यांना सायंकाळी हिशेब करत असताना काऊंटरमधील दागिन्यांचा एक डबा गायब असल्याचे लक्षात येताच धक्का बसला़ त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, वंदना तांदळे या कॅरिबॅगमध्ये डब्याच्या आकाराची वस्तू घेवून जात असल्याचे दिसून आले़ सुरुवातीला तांदळे हिने मात्र कॅरिबॅगमध्ये स्वेटर घेवून जात होते, असे पोलिसांना सांगितले होते़

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीसGoldसोनंArrestअटक