ध्वजारोहणाला गेलेल्या स्वयंपाकीचे घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:23 IST2021-08-19T04:23:38+5:302021-08-19T04:23:38+5:30

जिल्ह्यात तीन दुचाकी चोरीला जिल्ह्यात धर्माबाद, देगलूर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी तीन दुचाकी लांबविल्या. धर्माबादेत आर्य भवनच्या ...

The house of the cook who went to hoist the flag broke down | ध्वजारोहणाला गेलेल्या स्वयंपाकीचे घर फोडले

ध्वजारोहणाला गेलेल्या स्वयंपाकीचे घर फोडले

जिल्ह्यात तीन दुचाकी चोरीला

जिल्ह्यात धर्माबाद, देगलूर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी तीन दुचाकी लांबविल्या. धर्माबादेत आर्य भवनच्या पाठीमागून भास्कर रेड्डी चाकरोड, देगलूरच्या शारदानगर भागातून संगमेश्वर दिगांबर भुरे आणि शिवाजीनगर भागात नवी आबादी येथून शेख पाशा शेख फरीद यांची दुचाकी चोरीला गेली.

बिलोली तालुक्यात बैलजोडी लांबविली

बिलोली तालुक्यातील मौजे कराळा येथे शेतातील गोठ्यात बांधलेली ५० हजार रुपये किमतीची बैलजोडी चोरट्यांनी लंपास केली. ही घटना १६ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणात मधुकर नागनाथ वजीरे यांच्या तक्रारीवरून बिलोली ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

ट्रकचे जुने टायर केले लंपास

लोहा शहरात एका दुकानासमोर रिमोल्डसाठी ठेवण्यात आलेले ट्रकचे जुने २५ टायर, ट्रॅक्टरचे ४ टायर असे एकूण २५ हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लांबविले. ही घटना १३ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणात रुस्तम मगदूम शेख यांच्या तक्रारीवरून लोहा ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Web Title: The house of the cook who went to hoist the flag broke down