परिचारिका दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:17 IST2021-05-16T04:17:07+5:302021-05-16T04:17:07+5:30

दहेलीत ९५ टक्के लसीकरण सारखणी- प्राथमिक आरोग्य केंद्र दहेलीतांडा अंतर्गत येणाऱ्या दहेली येथील ९५ टक्के कोविड लसीकरण पूर्ण झाले ...

Hostess Day Celebration | परिचारिका दिन साजरा

परिचारिका दिन साजरा

दहेलीत ९५ टक्के लसीकरण

सारखणी- प्राथमिक आरोग्य केंद्र दहेलीतांडा अंतर्गत येणाऱ्या दहेली येथील ९५ टक्के कोविड लसीकरण पूर्ण झाले आहे. सरपंच तोटावार यांनी कोविड लसीकरण विषयी जनजागृतीसाठी आरोग्य पथकाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका, उपसरपंच, सदस्य यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये लसीकरण विषयीचे गैरसमज दूर केले. लसीकरण मोहिमेत अंगणवाडी सेविका सुलोचना कमटलवार, प्रतिभा पाटील, लता लोणे आदींनी परिश्रम घेतले.

आरोग्य केंद्रात औषधांची मदत

कुरुळा- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त शिवम पाटील मरशिवणे यांनी अत्यावश्यक औषधांची भेट दिली.

संभाजी महाराज जयंती साजरी

मालेगाव- मालेगाव येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज चौक, ग्रामपंचायत कार्यालय, दत्तनगर या ठिकाणी साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच अनिल इंगोले, उपसरपंच मनोहर खंदारे, डॉ. लक्ष्मण इंगोले, प्रल्हाद इंगोले, राजाभाऊ राजेवार आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजी राजे यांना अभिवादन

तामसा- तळेगाव, ता. हदगाव येथे छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सरपंच देविदास पंजरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बंडू पाटील, सतीश जाधव, अरविंद हरण, संतोष माने, उद्धव गायकवाड, अशोक वाडवे, चांदराव भालेराव, संजय साठे, रामदास जगताप आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन

निवघाबाजार- हदगाव तालुका कृषी कार्यालयाकडून मनुला येथील शेतकऱ्यांना खरीप हंगामाबाबत पेरणीपूर्व बियाणे व घ्यावयाची काळजी यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी आर.डी. रणवीर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ अधिकारी पाटील, कृषी सहायक शेवाळकर, सुदर्शन जाधव, रामजी पवार आदी उपस्थित होते.

ईद साजरी

हिमायतनगर- शहरासह तालुक्यात रमजान ईद कोरोनाच्या सावटाखाली साजरी करण्यात आली. इदगाहवर सामूहिक नमाज अदा न करता मुस्लीम बांधवांनी घरीच नमाज अदा करुन ईद साजरी केली. सरसम बु., सोनारी, पोटा बु., पारवा, जवळगाव आदी ठिकाणी रमजान ईद साजरी करण्यात आली.

वृक्षतोड सुरू

हदगाव- मनाठा व तामसा परिक्षेत्रात वन खात्याचे कर्मचारी फिरकत नसल्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. चाऱ्या खोदून पाणी अडविले जाते; मात्र आता उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात जळण जमा करण्यासाठी गावकरी जंगलात धाव घेत आहेत.

उपविभाग मंजूर करण्याची मागणी

धर्माबाद- नांदेड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे त्रिभाजन होत आहे. नायगाव, मुदखेड येथे उपविभाग मंजूर झाला आहे. धर्माबाद येथेही उपविभाग मंजूर करण्याची मागणी होत आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

Web Title: Hostess Day Celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.