जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी केवळ घोडेबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:18 IST2021-04-01T04:18:45+5:302021-04-01T04:18:45+5:30
मतदारांची संख्या कमी असल्याने त्या प्रत्येकांशी उमेदवारांचा थेट संपर्क होत असतो. या निवडणुकीसाठी महाआघाडी आणि भारतीय जनता पार्टीचे पॅनल ...

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी केवळ घोडेबाजार
मतदारांची संख्या कमी असल्याने त्या प्रत्येकांशी उमेदवारांचा थेट संपर्क होत असतो.
या निवडणुकीसाठी महाआघाडी आणि भारतीय जनता पार्टीचे पॅनल परस्परांना पराभूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. काही गटात सामना तसा सोपा असला तरी, बऱ्याच गटांत प्रतिष्ठेची लढाई होत आहे. अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडून येणे इतकाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यासाठी घोडेबाजार केला जात आहे. मुखेड, उमरी, मुदखेड, नायगाव, कंधार यासह काही ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत. येथे ज्या उमेदवारांच्या हाती लागले तेवढे मतदार त्या उमेदवाराने इतरत्र हलविले आहेत. त्या बदल्यात या मतदारांना ‘दामाजीराव’ सुद्धा प्रसन्न झाले असावेत, त्यामुळे धनशक्तीचा खुलेआम वापर हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य बनले आहे.