माहुरात कोरोना योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:34 IST2020-12-12T04:34:36+5:302020-12-12T04:34:36+5:30

या सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रमुख तथा टायगर ग्रुपचे सोनू वाटमारे तर प्रमुख उपस्थिती शिवसेना ...

Honoring Corona Warriors in Mahura | माहुरात कोरोना योद्ध्यांचा सत्कार

माहुरात कोरोना योद्ध्यांचा सत्कार

या सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रमुख तथा टायगर ग्रुपचे सोनू वाटमारे तर प्रमुख उपस्थिती शिवसेना उप जिल्हा प्रमुख तथा नांदेड जि.नियोजन समिती सदस्य ज्योतिबा खराटे,सुदर्शन नाईक, युवानेते ॲड.यशभाऊ खराटे, नामदेवराव कातले, शहराध्यक्ष निरधारी जाधव,अनिल वाघमारे,आशिष चारभाई, अनिल रुणवाल, सुमित राठोड,ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान, कार्तिक बेहेरे पाटिल यांची उपस्थिती होती.

सत्कारमूर्ती कोरोणा योद्ध्ये डॉ.वाघमारे, डॉ.अंबेकर, डॉ.वसिम, डॉ.निरंजन केशवे, पो.नि.लक्षमण राख, सहा.पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके, आण्णासाहेब पवार, राठोड, अन्नछत्र प्रमुख विजय कांबळे, आरोग्य कर्मचारी, रेणुका देवी संस्थान कर्मचारी, रूग्णवाहिका चालक, पत्रकार, महिला कर्मचारी, न.पं.स्वच्छता कर्मचारी यांचा शाल-श्रीफळ, साडी-चोळी असा यथोचित सत्कार करून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा सेना तालुका प्रमुख विकास कपाटे, सुत्रसंचालन जितू चोले यांनी तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिषेक जयस्वाल, विनोद भारती, पवन चव्हाण, अभिषेक दुबे, खुशाल तामखाने(युवासेना शहर प्रमुख), संदीप गोरडे(युवासेना शहर प्रमुख) यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Honoring Corona Warriors in Mahura