कोरोना योद्धयांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST2021-06-02T04:15:29+5:302021-06-02T04:15:29+5:30
वृक्षारोपण मोहीम प्रारंभ नांदेड - अर्धापूर तालुक्यातील कामठा बु. येथे वडार समाजातर्फे वृक्षारोपण मोहीम नुकतीच सुरू करण्यात आली. ...

कोरोना योद्धयांचा सत्कार
वृक्षारोपण मोहीम प्रारंभ
नांदेड - अर्धापूर तालुक्यातील कामठा बु. येथे वडार समाजातर्फे वृक्षारोपण मोहीम नुकतीच सुरू करण्यात आली. उपसरपंच रणजितसिंघ कामठेकर यांच्या हस्ते महादेव मंदिर-खंडोबा मंदिराचे पटांगण याठिकाणी वडाची झाडे लावून या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य इरबा गुंजकर, शिवशंकर बरगळ, सोमनाथ दासे, बबन गव्हाणे, गुंजकर, शिवाजी वाघमारे, धनाजी गाढवे, संजय साखरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या वतीने १० हजार झाडे लावण्याचा संकल्प यावेळी उपसरपंच कामठेकर यांनी व्यक्त केला.
मातंग समाजाला आंबेडकरवाद हाच पर्याय - बळवंत घोरपडे
नांदेड- बहुजन समाजातील अनेक जाती-जमातींची प्रगती आंबेडकरवाद स्वीकारल्यामुळे झालेली आहे. त्या तुलनेत मातंग समाज मात्र फार पिछाडीवर राहिलेला आहे. कारण हा समाज आतापर्यंत आंबेडकरवादी विचारापासून अंतर ठेवून वागत आला आहे. म्हणून मातंग समाज इतरांच्या तुलनेत मागे राहू नये, असे वाटत असेल तर या समाजाला आंबेडकरवाद हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील जे.एन.यू. विद्यापीठातील विद्यार्थी बळवंत घोरपडे यांनी केले.
डॉ. अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त ३१ मे रोजी पंकजनगर, धनेगाव येथे डॉ. अण्णा भाऊ साठे यांचा आंबेडकरवाद आणि सद्यस्थिती या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून घोरपडे बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ नेते गंगाराम कांबळे हे होते. उद्घाटन विनायकराव डोईबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भगवान बुद्ध, महात्मा बसवेश्वर, कार्ल मार्क्स, महाराणा प्रताप आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली.
यावेळी बहुजन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम टोंपे, बालाजीराव गुंडिले, प्रभाकर ढवळे, विश्वनाथ वाघमारे, शाहीर डी.एन. वाघमारे, बळी आंबटवाड, पंडित सोनकांबळे, अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सचे जिल्हाध्यक्ष बाबू शिंदे, बहुजन मजूर कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नामदेव झुंजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारोती चिवळीकर यांनी केले, तर कृष्णा बाबळे यांनी आभार मानले. याप्रसंगी आ. रावसाहेब अंतापूरकर, जि.प. माजी अध्यक्ष संभाजीराव मंडगीकर, वनश्री पुरस्कार प्राप्त शेषराव पवार तथा शेषा मांग, उपेंद्र तायडे आणि चांदू गंगाराम कांबळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
साहेबराव कोळेकर सेवानिवृत्त
नांदेड- गुरू नानक विद्या मंदिर शिवनगर, नांदेड येथील ज्येष्ठ शिक्षक साहेबराव अर्जुनराव कोळेकर हे ३१ मे रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती निमित्त संत नंदी महाराज पुरुष बचत गट नांदेड यांच्या वतीने कोळेकर यांचा सपत्नीक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी बचत गटाचे सचिव शिवाजीराव देलमडे होते. प्रमुख अतिथी म्हणून बचत गटातील सदस्य बाबूराव घुगे, विलास वेणीकर, दिगंबर घोलप, एस.एस. मुगटकर, श्रीपती जानकर, श्रीरामे, अॅड. गंगातीर, अॅड. नवले, अॅड. हामंद, मारोतराव मेखाले, मुसळे, बालाप्रसाद काबरा, टारपे, मेंडके, बालाजीराव कोळी उपस्थित होते.
अहिल्याबाई होळकर जयंती साजरी
नांदेड , अर्धापूर तालुक्यातील कामठा (बु) ग्रामपंचायत कार्यालय व खंडोबा मंदिर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच प्रतिनिधी विश्वनाथ दासे, उपसरपंच रणजितसिंघ कामठेकर शिवसेना तालुकाध्यक्ष संतोष कपाटे, पंचायत समिती उपसभापती अशोकराव कपाटे, शिवसेना तालुका उपप्रमुख संतोष कदम बामणीकर, श्रीराम पाटील, शंकर कंगारे, राजू निकम, संजय साखरे, सतीश व्यवहारे, विनोद निकम, ज्ञानेश्वर निकम, राजेश उराडे, इरबा गुंजकर, साईनाथ साखरे, नारायण साखरे, आनंद साखरे आदी उपस्थित होते.