हिमायतनगर तालुक्यात २६० बालके कुपोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:50 IST2018-01-18T00:49:23+5:302018-01-18T00:50:06+5:30
तालुक्यात १३२ अंगणवाड्यांतील ९००९ बालकांपैकी कमी वजन असलेले ९२१ तर २६० कुपोषित बालके आहेत, अशी माहिती महिला बालविकास प्रकल्प अधिकारी सुदेश मांजरमकर, विस्तार अधिकारी थेटे यांनी दिली.

हिमायतनगर तालुक्यात २६० बालके कुपोषित
लोकमत न्यूज नेटवर्क
हिमायतनगर : तालुक्यात १३२ अंगणवाड्यांतील ९००९ बालकांपैकी कमी वजन असलेले ९२१ तर २६० कुपोषित बालके आहेत, अशी माहिती महिला बालविकास प्रकल्प अधिकारी सुदेश मांजरमकर, विस्तार अधिकारी थेटे यांनी दिली.
तालुक्यातील १०९ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे. ७ अंगणवाडी समाजमंदिरात तर ४ भाड्याच्या इमारतीत भरतात. १४ व्या वित्त आयोगातून ३५ अंगणवाड्यांत शौचालय बांधकाम झाले तर ५४ अंगणवाड्यांत शौचालये नाहीत. ४३ अंगणवाड्या नादुरुस्त असल्याचेही मांजरमकर यांनी सांगितले.२००१ च्या जनगणनेनुसार तालुक्यात ५६,२९९ पुरुष तर ५२ हजार ९०६ महिला आहेत. ० ते ६ महिन्यांची बालके १०१२, ६ महिने ते १ वर्षे ७१२, १ ते ३ वर्षांची बालके ३५७८, ३ ते ५ वर्षांची ३८२६ असे एकूण ० ते ५ वर्षे ९१२८, ५ ते ६ वर्षे असलेली १५४८, ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके १०६७६ आहेत़ गरोदर स्त्री ९०१, स्तनदा माता १०१२, वजन घेतलेल्या ० ते ६ वर्षे बालकाची संख्या १०१९० साधारण श्रेणी ९०९ आहे़
जेथे अंगणवाड्या नाहीत वा नादुरुस्त आहेत, तेथील अंगणवाड्यांसाठी १४ व्या वित्त आयोगातील १० टक्के निधी बाजूला काढून त्यातून शौचालय बांधावेत, असे आवाहन मांजरमकर, थेटे यांनी केले. तालुक्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही मांजरमकर व थेटे यांनी सांगितले.